Tuesday, August 18, 2026
Homeचंद्रपूरवैनगंगा नदीत बुडून मृत्यूमुखी; मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत.....

वैनगंगा नदीत बुडून मृत्यूमुखी; मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत.. – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही तासांतच दिली मंजुरी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील व्याहाड (बु.)येथील वैनगंगा नदीपात्रात गडचिरोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आठ विद्यार्थी व्हॉलिबॉल खेळत असतांना बॉल पाण्यात गेला. त्यामुळे एकजण त्याच्या मागे धावला आणि खोल पाण्यात गेला.त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात तिघे धावले असता,त्यापैकी दोघे आणि खोल पाण्यात गेलेला तरुण बुडाल्याची घटना शनिवार १० मे रोजी घडली.१.पार्थ बाळासाहेब जाधव वय २० वर्षे,रा.पाथरे खुर्द ता.राहुरी जि.अहिल्यानगर, २.गोपाल गणेश साखरे वय २० वर्षे,रा.भडगाव ता.जि.बुलढाणा,३.स्वप्निल उद्धलसिंग शिरे वय २१ वर्षे,रा. रांजणगाव,कमलापूर,वाळूज,छत्रपती संभाजीनगर हे तिघेही वैनगंगा नदीत बुडालेले होते.अश्यातच आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना मदत मिळावी,यासाठी प्रयत्न केले होते.त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही तासांतच प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या कारचा भीषण अपघात; पोलिस कर्मचारीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चंद्रपूर-मूल मार्गावरील वलनी- बोर्डा वळण मार्गावर आज,सोमवार १७ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या भीषण कार अपघातात एका महिला पोलिस कर्मचारीचा...

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!