Friday, August 28, 2026
Homeभंडारामहसूल विभाग सुधरण्याचे नावच घेईना..! अवैध रेती भरलेला ट्रॅक्टर सोडायचाच असेल...

महसूल विभाग सुधरण्याचे नावच घेईना..! अवैध रेती भरलेला ट्रॅक्टर सोडायचाच असेल तर पकडता कशाला?…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-कुठे मारझोड होते,तर कुठे शिवीगाळ,कुठे धक्काबुक्की केली जाते,तर कुठे पाहून घेण्याच्या धमक्या दिल्या जातात.मात्र,काही भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांची बाजू न घेता चंद पैश्याच्या हव्यासापोटी  प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.अशातच भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील खैरलांजी (हरदोली) शिवारात महसूल विभागाचे नायब तहसीलदार आणि तलाठी यांच्या पथकाने काल,बुधवारी १६ एप्रिलला सकाळच्या सुमारास अवैध रेती वाहतुकीच्या ट्रॅक्टरवर सुरुवातीला कारवाई केली व तब्बल चार तासांपर्यंत ट्रॅक्टर सिहोरा राष्ट्रीय महामार्गाजवळ थांबविण्यात आला.पण सदरचा ट्रॅक्टर अचानक घटनास्थळावरून पळवून लावण्यात आल्याने महसूल विभाग सुधरण्याचे नावच घेईना..! असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.त्यातच अवैध रेती भरलेला ट्रॅक्टर सोडायचाच असेल तर पकडता कशाला? अशी म्हणण्याची वेळ आली आहे.घटनास्थळी कारवाईच्या वेळी वाहनचालकाकडे रेतीची रॉयल्टी नव्हती,हे महसूल अधिकाऱ्यांनी मान्य केले.तरीही चार तास तिथे थांबून कारवाई टाळण्यात आली,आणि ट्रॅक्टर गायब झाले.काही दिवसांपूर्वी तुमसरचे उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे आणि तहसीलदार मोहन टिकले यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आल्यानंतरही काहीजण सुधरण्याचे नाव घेत नाहीत. त्यामुळे अशांना काळ्या पाण्याची सजा द्यावी की अन्य..असा प्रश्न अनुत्तरीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!