- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-एका तरुणाची मुंबईतील महिलेसोबत फेसबुकवर ओळख झाली.कालांतराने ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले.लग्न करू म्हणून तरुणाने अनेक भेटींनंतर शारीरिक संबंध ठेवले होते.अशातच तरुणाने इतर महिलांशी संपर्क वाढवला.याबद्दल फेसबुकवर ओळख झालेल्या महिलेला याची कानकुन लागली.यातून वादावादी झाल्यानंतर तरुणाने महिलेशी बोलणे टाळले.त्यामुळे नैराश्यातून महिलेने ३ डिसेंबर २०२४ रोजी आत्महत्या करून स्वतःचे जीवन संपवले होते.प्रकरणी पोलिसांनी तरुणाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता.या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी तरूणाने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. त्यानुसार सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण आर.नवंदर यांनी जामीन देतांना स्पष्ट केले की, प्रेमसंबंधात लग्न करण्याचे दिलेले वचन कालांतराने मोडणे हा काही आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा ठरत नाही,अनेकदा प्रेमसंबंध असलेल्या महिलेच्या आत्महत्या प्रकरणांत लग्नाचे वचन मोडून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला जातो.मात्र हा आरोप सिद्ध करण्यासाठी आवश्यक हेतूच नसतो,असा महत्वपूर्ण निर्वाळा देत सत्र न्यायालयाने प्रकरणातील आरोपी तरुणाला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.त्यावर सरकारी पक्षाने जोरदार आक्षेप घेतला होता.अर्जदार तरुणाचे आत्महत्या केलेल्या महिलेशी प्रेमसंबंध होते.मात्र त्या तरुणाच्या अनैतिक कृत्यांमुळे महिलेला जीव गमवावा लागला.अशा परिस्थितीत तरुणाचे कृत्य आत्महत्येस प्रवृत्त करण्यासारखे आहे,असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.तरुणाच्या वकिलांनी मात्र आरोपाचे खंडन केले.महिलेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याचा हेतूच नव्हता,असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला.दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने तरुणाला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
- Advertisement -

