- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-कुठे मारझोड होते,तर कुठे शिवीगाळ,कुठे धक्काबुक्की केली जाते,तर कुठे पाहून घेण्याच्या धमक्या दिल्या जातात.मात्र,काही भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांची बाजू न घेता चंद पैश्याच्या हव्यासापोटी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.अशातच भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील खैरलांजी (हरदोली) शिवारात महसूल विभागाचे नायब तहसीलदार आणि तलाठी यांच्या पथकाने काल,बुधवारी १६ एप्रिलला सकाळच्या सुमारास अवैध रेती वाहतुकीच्या ट्रॅक्टरवर सुरुवातीला कारवाई केली व तब्बल चार तासांपर्यंत ट्रॅक्टर सिहोरा राष्ट्रीय महामार्गाजवळ थांबविण्यात आला.पण सदरचा ट्रॅक्टर अचानक घटनास्थळावरून पळवून लावण्यात आल्याने महसूल विभाग सुधरण्याचे नावच घेईना..! असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.त्यातच अवैध रेती भरलेला ट्रॅक्टर सोडायचाच असेल तर पकडता कशाला? अशी म्हणण्याची वेळ आली आहे.घटनास्थळी कारवाईच्या वेळी वाहनचालकाकडे रेतीची रॉयल्टी नव्हती,हे महसूल अधिकाऱ्यांनी मान्य केले.तरीही चार तास तिथे थांबून कारवाई टाळण्यात आली,आणि ट्रॅक्टर गायब झाले.काही दिवसांपूर्वी तुमसरचे उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे आणि तहसीलदार मोहन टिकले यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आल्यानंतरही काहीजण सुधरण्याचे नाव घेत नाहीत. त्यामुळे अशांना काळ्या पाण्याची सजा द्यावी की अन्य..असा प्रश्न अनुत्तरीत आहे.
- Advertisement -

