Saturday, September 5, 2026
Homeचंद्रपूरमालवाहू ट्रॅक्टर पकडल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे सांगत ३४ हजार रुपयांनी...

मालवाहू ट्रॅक्टर पकडल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे सांगत ३४ हजार रुपयांनी गंडविले…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-मालवाहू ट्रॅक्टर पकडल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे सांगत ट्रॅक्टर सोडविण्यासाठी मूल येथील एका व्यक्तीला ३४ हजार रुपयांनी गंडविले.यासंदर्भात ट्रॅक्टर मालकाच्या लक्षात येताच पोलिसांत तक्रार दाखल केली.दोन तासांच्या आत मूल पोलिसांनी चंद्रपूर येथील तिघांना काल शुक्रवारी पहाटे अटक केली.मनीष राऊत वय ४० वर्षे रा. बाबूपेठ,चंद्रपूर असे मुख्य आरोपीचे नाव असून त्याच्यासोबत अन्य दोघांना अटक करण्यात आली आहे.
आठ दिवसांपूर्वी पहाटेच्या सुमारास तिघे जण मूल येथे इनोवा क्रमांक-एम.एच.०३ ए.झेड.९३८१ या वाहनाने आले.त्यानंतर येथील रहिवासी विशाल बट्टे यांच्या मालकीचा मालवाहतूक ट्रॅक्टर पकडला. स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याची बतावणी करून ट्रॅक्टर सोडवायचा असेल तर ५० हजार रुपयांची मागणी केली. पोलिस स्टेशनला गाडी लावण्याची धमकीही त्यांनी दिली. कारवाईच्या भीतीपोटी विशाल बट्टे यांनी २५ हजार रुपये ऑनलाइन दिले व उर्वरित पैसे नंतर देण्याच्या अटीवर ट्रॅक्टर सोडला.दुसऱ्या दिवशी पुन्हा ९ हजार रुपये ऑनलाइन दिले.मात्र,उर्वरित १६ हजार रुपयांच्या मागणीसाठी आरोपींनी विशालकडे तगादा लावला. या त्रासाने विशालला आरोपीवर शंका आल्याने आली.त्यानंतर पोलिस नातेवाइकांच्या मदतीने स्थानिक गुन्हे शाखेमध्ये मनीष राऊत नावाचा अधिकारी आहे काय? याची माहिती घेतली.मात्र,या नावाचा कोणीही अधिकारी नसल्याची खात्री पटल्यानंतर गुरुवारी मूल पोलिस स्टेशनला त्याने तक्रार दाखल केली.तक्रार दाखल होताच पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलिस निरीक्षक प्रमोद चौगुले यांनी तपासाची सूत्रे फिरवली आणि अवघ्या २ तासांच्या आत आरोपीला चंद्रपूर येथून अटक केली.पुढील तपास मूल पोलिस करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!