- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-नुकतेच राज्य शासनाने राज्यातील सर्व शासकीय कार्यालये तसेच निमशासकीय कार्यालयांमध्ये व इतर विविध आस्थापनांमध्ये मराठी भाषेत बोलणे अनिवार्य केले आहे.तत्पूर्वी गेल्या काही दिवसांमध्ये मराठी भाषा आणि मराठी माणसांच्या अवमाननेच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.अशातच एका कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने मराठी भाषेबद्दल अनादर करून ‘मराठी गया तेल लगाने’ असे वक्तव्य केल्यानंतर पवईमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला चांगलेच धोपटून महाराष्ट्रातील मराठी माणसाची तसेच राज ठाकरेंची माफी मागतो,असे म्हणायला लावत मनसे स्टाइलने समजावले.
पवईतील ‘एल अँड टी’ कंपनीचा सुरक्षा रक्षक व एक व्यक्ती काही मुद्यावरून संभाषण करू लागले. अशातच सुरक्षा रक्षक हिंदीमध्ये बोलू लागल्याने व्यक्तीने मराठीत बोला,मला हिंदी येत नाही,असे म्हटले.त्यावर सुरक्षा रक्षक मुझे मराठी नहीं आती, मै मराठी मे क्यूँ बोलू,मराठी गया तेल लगाने,असे वक्तव्य केले.सदर वक्तव्याचा व्हिडिओ वायरल होताच राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी तिथे पोहोचले व सर्वप्रथम मनसे सैनिकांनी सुरक्षा रक्षकाच्या कानाखाली लगावली व महाराष्ट्रात रहायचे असेल तर मराठी शिकावी लागेल आणि महाराष्ट्रातील मराठी माणसाची तसेच राज ठाकरेंची माफी मागतो,असे म्हणायला लावत मराठी शिका व मराठीत बोला,असे म्हणत कानाखाली वाजवली.यानंतर त्या सुरक्षारक्षकाने माफी मागत मी मराठी शिकण्याचा प्रयत्न करेन,असे म्हटले आहे.
- Advertisement -

