Monday, September 7, 2026
Homeनागपूरवाघाचे अवयव शिकार प्रकरणी धक्कादायक माहिती; सट्टापट्टीत आकडे सांगण्यासाठी वाघाच्या अवयवांचा वापर..

वाघाचे अवयव शिकार प्रकरणी धक्कादायक माहिती; सट्टापट्टीत आकडे सांगण्यासाठी वाघाच्या अवयवांचा वापर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नागपूर प्रादेशिक वनविभागांतर्गत येणाऱ्या खापा वनपरिक्षेत्रात वाघाची शिकार झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली असून अज्ञात शिकाऱ्यांनी वाघाचे चारही पंजे,मिशा आणि दात काढून नेले आहेत.अशातच आता वाघाचे अवयव शिकार प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिकारी हे सट्टापट्टीत आकडे सांगण्यासाठी वाघाच्या अवयवांचा वापर करीत असल्याची माहिती पुढे आली आहे. यापूर्वीही मे २०१९ मध्ये रामटेक गडमंदिर परिसरात असाच एक प्रकार घडला होता.मध्यप्रदेश
भागातील आदिवासी टोळ्या प्रथम जादूटोण्यासाठी आणि नंतर सवयीने वन्यप्राण्यांची शिकार करतात. प्रकरणी वनविभागाचे पथक मध्यप्रदेश राज्याच्या छिंदवाडा जिल्ह्यातील चाकारा,सारदुनी,तोरणी, चौरेफाटा आणि राघादेवी या आदिवासी गावांमध्ये तपास करीत आहेत.२०१९ मध्ये वनविभागाने वाघाच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली होती.मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील हलाल गावातून वाघाचे पुरलेले अवयव जप्त करण्यात आले होते.त्यानुसार वन विभागाचे पथक तपास करीत असून छिंदवाडा जिल्ह्यातील स्थानिक लोक शंकरपटाच्या बैल बाजारात बैल बसवणे आणि सट्टापट्टीत आकडे सांगण्यासाठी वाघाच्या अवयवांचा वापर करतात.दहा ते पंधरा जणांच्या टोळ्या एकत्र फिरतात.या गावकऱ्यांकडे छर्रेमार व भरमार बंदुका असून महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे(एफडीसीएम)काम बंद झाल्यामुळे बेरोजगार झालेले स्थानिक मजूर,ज्यांना जंगलाची चांगली माहिती आहे,ते शिकाऱ्यांना मदत करीत असतात.त्यामुळे वन विभागाचे पथक मध्यप्रदेशातील शिकाऱ्यांच्या मागावर आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!