Saturday, September 5, 2026
Homeचंद्रपूरकाळजी करू नका; मी पक्ष सोडून जाणार नाही- विजय वडेट्टीवार -...

काळजी करू नका; मी पक्ष सोडून जाणार नाही- विजय वडेट्टीवार – तळ्यात-मळ्यात अशी दुहेरी भूमिका वठविणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षात स्थान नाही..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-पक्ष हा पक्ष असतो.ज्या पक्षात एकनिष्ठपणाने आजवरती काम केले,त्याला सोडून जाणे हे कदापि शक्य नाही.एखाद्या पक्षाच्या हाती चिरकाल सत्ता राहील असे कधीच होत नाही.दिवस पालटतील व पुन्हा आम्ही सत्तेत येऊ.सत्तेसाठी जे पक्ष सोडून गेलेत त्यांची आज काय परिस्थिती आहे, म्हणून मी पक्ष सोडणार नाही.आपण सर्व मिळून एकजुटीने संघर्ष करू,असे प्रतिपादन राज्याचे माजी विरोधी पक्ष नेते तथा विधिमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.
पुढे संधी मिळाल्यास आपण लोकसभेसाठी तयारी करणार मी पक्ष सोडून जाणार नाही,काळजी करू नका,असे भावनिक आवाहनही त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.ब्रम्हपुरी येथे आयोजित तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने सत्कार सोहळा व कार्यकर्ता मेळावा  प्रसंगी ते बोलत होते.तत्पूर्वी विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती झाल्याबद्दल वडेट्टीवार यांचा काँग्रेसच्या तालुका,शहर,युवक काँग्रेस महिला काँग्रेस,अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक सेल,व्यापारी संघटना,तसेच जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाच्या पदाधिकाऱ्यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
ब्रहापुरीतील तत्कालीन काँग्रेस कार्यकर्ते विलास विखार व अन्य काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश यावर बोलतांना वडेट्टीवार म्हणाले की,स्वस्वार्थ व अर्थकारण या लोभाने काही कार्यकर्ते वाल्मिक कराड याच्या प्रमाणे वागू लागतात.गोसेखुर्दमध्ये लागणाऱ्या ९० कोटींच्या रेतीसाठी हा भाजप प्रवेश करण्यात आल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.यापुढे तळ्यात आणि मळ्यात अशी दुहेरी भूमिका वठविणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षात स्थान राहणार नाही.जो कार्यकर्ता एक निष्ठेने कार्य करेल त्याचाच पक्ष आदर व सन्मान करेल असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी खासदार डॉ.नामदेव किरसान,ज्येष्ठ नेते डॉ.देविदास जगनाडे,सेवादलाचे गुडेवार,तालुकाध्यक्ष खेमराज तिडके,शहराध्यक्ष हितेंद्र राऊत,बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर,डॉ.राजेश कांबळे,प्रमोद चिमुरकर,यशवंत दिघोरे, थानेश्वर कायरकर,मोंटू पिलारे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!