Sunday, April 19, 2026
Homeपुणेबसमध्ये तरुणीवर अत्याचार; आरोपी पसार..

बसमध्ये तरुणीवर अत्याचार; आरोपी पसार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
पुणे :- बसस्थानक परिसरात उभ्या शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार (बलात्कार) झाल्याची घटना काल,मंगळवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास घडली असून आज,बुधवारी दुपारच्या उघडकीस आल्याने राज्यात सदर घटनेबाबत सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.
अधिक माहिती अशी की,पीडित तरुणी काल मंगळवारी पहाटेच्या सुमारास पुण्याहून फलटणला जाण्यास निघाली होती.त्यातच ती स्वारगेट बसस्थानकावर बसची वाट पाहत थांबली होती.अशातच ती बसची वाट पाहत असतांना एक अज्ञात इसम तिच्याजवळ येऊन बोलू लागला व तिची बस दुसरीकडे असल्याचे भासवून तिला दुसऱ्या बसकडे नेले.बसमध्ये कुणीही नसल्याचे पाहून त्याने तिच्यावर अतिप्रसंग करून बलात्कार केला. व आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.त्यातच तरुणीने घडलेला सर्व प्रकार मित्राला सांगितला. मित्राने घटनेबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला.त्यानुसार तरुणीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.त्यानुसार सर्व प्रकार उघडकीस आल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.पोलिसांनी स्वारगेट बस स्थानक परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारावर आरोपीची ओळख पटवली असून दत्तात्रय रामदास गाडे असे आरोपीचे नाव आहे.त्याच्यावर शिक्रापूर व शिरूर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे.आरोपी अद्यापही फरार असल्याने पोलीस त्याच्या मागावर आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

कहाणीमध्ये ट्विस्ट.! ना वाघ ना बिबट्या; घातपाताचा संशय.. – जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीट एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

पोलिसांच्या एका चुकीमुळे गडचिरोली हत्या प्रकरणातील ‘त्या’ आरोपीस मिळाला जामीन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सात वर्षावरील गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला चोवीस तासांच्या आत न्यायालयातील न्याय दंडाधिकारी यांच्या समक्ष हजर करावे लागते.त्यानुसार,न्यायालय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!