Saturday, April 18, 2026
Homeगोंदियाजिल्हा परिषद शाळा केशोरी येथे पाककृती स्पर्धा संपन्न..

जिल्हा परिषद शाळा केशोरी येथे पाककृती स्पर्धा संपन्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या केशोरी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत आज,बुधवार १२ फेब्रुवारीला
पाककृती स्पर्धा मोठ्या थाटात पार पडली.पाककृती स्पर्धेस गावातील माता-पालक भगिनी मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्या होत्या.आयोजित स्पर्धेत गावातील माता-पालक भगिनींनी विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे पक्वान्न तयार केले होते.स्पर्धेचे मूल्यांकन केंद्रातील पदवीधर शिक्षक सोनवाने यांनी केले.त्यानुसार गावातील कल्पना गहाणे यांच्या सर्वोत्कृष्ट पाककृतीची निवड तालुकास्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली.स्पर्धेस शाळेतील संपूर्ण शिक्षक वृंदांचे सहकार्य लाभले.सदर स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या सर्व माता-पालक भगिनींचे शाळेच्या वतीने आभार व्यक्त करीत विजेत्या माता भगिनिस अभिनंदनाचा वर्षाव करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेचा कहर; उद्याला नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वाढत्या उष्णतेच्या लाटेचा कहर लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या,शनिवार १८ एप्रिल रोजी नागपूर...

खताचा काळाबाजार भोवला; देसाईगंजच्या कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत(DAP)अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे,खताचा काळाबाजार करणे तसेच शासकीय ई-पॉस(e-POS) प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्रचे संचालक...

देसाईगंज-आरमोरी काँग्रेस कमिटीची “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या सिंधू भवन येथे आज,शुक्रवार १७ एप्रिल रोजी तालुका काँग्रेस कमिटी देसाईगंज-आरमोरी यांच्या वतीने आयोजित “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” उत्साहात पार...

भोंदूबाबाच्या निकटवर्तीयाचा कार अपघातात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचे कारनामे उघड होताच अख्खा महाराष्ट्र हादरून गेला.विधीच्या नावाने अनेक उच्चभ्रू महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अशोक खरातला ताब्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!