Friday, April 17, 2026
Homeनागपूरदारूच्या नशेत आरोग्य सेवकाच्या झोकांड्या; पोलिसांत गुन्हा दाखल..

दारूच्या नशेत आरोग्य सेवकाच्या झोकांड्या; पोलिसांत गुन्हा दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-शासकीय नोकरीसाठी माऱ्या-माऱ्या करणाऱ्यांना नोकरी मिळत नाही.तर ज्यांना नोकरी मिळते त्यांना नोकरीची कदर नसल्याचा प्रकार नुकताच भिवापूर तालुक्यात उघडकीस आला आहे. शासकीय कर्तव्य बजावत असतांना मनसोक्त दारू पिऊन झोकांड्या मारणे आरोग्य सेवकास चांगलेच महागात पडले असल्याची घटना भिवापूर तालुक्याच्या नक्षी गावात दोन दिवसांपूर्वी म्हणजेच सोमवारी दुपारी उघडकीस आला.झिंगलेल्या अवस्थेत राज्य महामार्गावर पडून अश्लील शिवीगाळ करणाऱ्या आरोग्य सेवकाच्या विरोधात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्याने आरोग्यसेवकावर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पदमाकर लक्ष्मण भुते वय ४५ वर्षे,रा.नक्षी,ता.भिवापूर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोग्यसेवकाचे नाव आहे.त्याची सोमनाळा ता.भिवापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या नक्षी येथील उपकेंद्रात आरोग्य सेवकपदी नियुक्ती आहे.त्याला दारूचे व्यसन असल्याने,तो सोमवारी कर्तव्यावर असतांना दारू प्यायला होता.दारूच्या नशेत तो झोकांड्या घेत, कसातरी बसस्टॉपासून मुख्य मार्गाने चालत होता. मध्येच रोडवर बसून अश्लील शिवीगाळ करीत होता. नागरिकांनी हा प्रकार लगेच वैद्यकीय अधिकारी डॉ.केवल कोरडे यांना सांगितला.त्यांनी नगेच नक्षी गाठून पाहणी केली आणि त्याला पोलिस ठाण्यात नेत तक्रार दाखल केली.त्यानुसार भिवापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेचा कहर; उद्याला नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वाढत्या उष्णतेच्या लाटेचा कहर लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या,शनिवार १८ एप्रिल रोजी नागपूर...

खताचा काळाबाजार भोवला; देसाईगंजच्या कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत(DAP)अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे,खताचा काळाबाजार करणे तसेच शासकीय ई-पॉस(e-POS) प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्रचे संचालक...

देसाईगंज-आरमोरी काँग्रेस कमिटीची “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या सिंधू भवन येथे आज,शुक्रवार १७ एप्रिल रोजी तालुका काँग्रेस कमिटी देसाईगंज-आरमोरी यांच्या वतीने आयोजित “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” उत्साहात पार...

भोंदूबाबाच्या निकटवर्तीयाचा कार अपघातात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचे कारनामे उघड होताच अख्खा महाराष्ट्र हादरून गेला.विधीच्या नावाने अनेक उच्चभ्रू महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अशोक खरातला ताब्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!