Friday, April 17, 2026
Homeदेसाईगंजदुचाकी चोरट्याच्या देसाईगंज पोलिसांनी आवळल्या मुसक्या.. - ३ लाख ८० हजारांचा मुद्देमाल...

दुचाकी चोरट्याच्या देसाईगंज पोलिसांनी आवळल्या मुसक्या.. – ३ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या आमगाव येथे चोरीतील दुचाकी विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकी चोट्याच्या देसाईगंज पोलिसांनी मुसक्या आवळून चोरट्याकडून  ३ लाख ८० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. समीर राजरतन चहांदे वय ३६ वर्षे,रा.रुई (निलज/पाचगाव),ता.ब्रम्हपुरी,जि.चंद्रपूर असे दुचाकी चोरणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की,देसाईगंज तालुक्याच्या नैनपूर येथील एका नागरिकाचे दुचाकी वाहन चोरीला गेल्याने सदर दुचाकी मालकाने चोरीसंबंधी देसाईगंज पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.त्यानुसार देसाईगंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप आगरकर यांच्याकडे गुन्ह्याचा तपास सुरू असतांना त्यांना चोरीचे वाहन आमगाव येथे विकल्या जात असल्याची गुप्त माहिती मिळाली.त्यानुसार आगरकर आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले.समीर चहांदे यांस दुचाकी विक्री करणाऱ्या वाहनाबाबत विचारपूस केली असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली.त्यामुळे समीर चहांदे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडील हिरो कंपनीची एम.३३ वाय ३७२० क्रमांकाची मोटारसायकल जप्त केली.पोलिसी खाक्या दाखवताच समीर चहांदे याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली.तपासाअंती समीर चहांदे यांच्यावर देसाईगंज येथे तीन,ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात दोन आणि आरमोरी पोलीस ठाण्यात एक  असे वाहन चोरीचे सहा गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.पोलिसांनी ३ लाख २५ हजार रुपयांच्या सहा आणि ७५ हजार रुपयांची अन्य एक मोटारसायकल असा एकूण ३ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी समीर चहांदे यास अटक केली.सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अजय जगताप यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप आगरकर,पोलिस शिपाई विलास बालमवार,दिनेश सोनकुसरे,नीतेश कढव व सहकाऱ्यांनी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेचा कहर; उद्याला नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वाढत्या उष्णतेच्या लाटेचा कहर लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या,शनिवार १८ एप्रिल रोजी नागपूर...

खताचा काळाबाजार भोवला; देसाईगंजच्या कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत(DAP)अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे,खताचा काळाबाजार करणे तसेच शासकीय ई-पॉस(e-POS) प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्रचे संचालक...

देसाईगंज-आरमोरी काँग्रेस कमिटीची “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या सिंधू भवन येथे आज,शुक्रवार १७ एप्रिल रोजी तालुका काँग्रेस कमिटी देसाईगंज-आरमोरी यांच्या वतीने आयोजित “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” उत्साहात पार...

भोंदूबाबाच्या निकटवर्तीयाचा कार अपघातात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचे कारनामे उघड होताच अख्खा महाराष्ट्र हादरून गेला.विधीच्या नावाने अनेक उच्चभ्रू महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अशोक खरातला ताब्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!