Sunday, June 21, 2026
Homeदेसाईगंजयुवक काँग्रेस कमिटीच्या देसाईगंज शहराध्यक्षपदी विजय पिल्लेवान यांची नियुक्ती...

युवक काँग्रेस कमिटीच्या देसाईगंज शहराध्यक्षपदी विजय पिल्लेवान यांची नियुक्ती…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा युवक काँग्रेस कमिटीची नुकतीच विविध पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक गडचिरोली येथे पार पडली.बैठकीत विविध विषयांवर चर्चा करून पुढील रणनीती आखण्यात आली.तसेच जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या रिक्त असलेल्या पदांच्या नियुक्त्या प्रदान करण्यात आल्या.त्यात प्रामुख्याने युवक काँग्रेस कमिटीच्या देसाईगंज शहराध्यक्षपदी विजय पिल्लेवान यांची नियुक्ती करण्यात आली.बैठकीत गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेव किरसान,गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे,गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड,गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष सतीश विधाते सह उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.त्यानंतर विविध मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील पदाधिकारी पदांच्या नियुक्त्या प्रदान करण्यात आल्या.यात युवक काँग्रेस कमिटीच्या देसाईगंज शहराध्यक्षपदी विजय पिल्लेवान यांच्या नियुक्तीचे पत्र गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेव किरसान,गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.युवक काँग्रेस देसाईगंज शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विजय पिल्लेवान यांनी आपल्या यशाचे श्रेय राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार,आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांना दिले असून प्रत्यक्ष भेट घेत त्यांचे आभार व्यक्त केले आहे.
नियुक्तीचे प्रदान करतेवेळी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विश्वजित कोवासे,ओबीसी संघटनेचे अध्यक्ष सागर वाढई, कैलास वानखेडे तालुकाध्यक्ष ओबीसी विभाग,अमर भर्रे तालुकाध्यक्ष युवक काँग्रेस देसाईगंज,विलास बन्सोड,ऋषिकेश मसराम,कमलेश बारस्कर,जितू  चौधरी,स्वप्नील मिसार व विविध कार्यकर्ते उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा..

उद्रेक न्युज वृत्त :-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावर मोठा दिलासा मिळाला आहे.महाराष्ट्र राज्यातील तब्बल...

माहिती अधिकार कायद्यातील बदलांवर नाराजी; अण्णा उतरणार मैदानात.. – माहिती न देणाऱ्या चोरट्यांचे काय?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य सरकारने गेल्या आठवड्यात एक राजपत्र काढून माहिती अधिकार कायद्यात काही महत्त्वाचे बदल केले आहेत.शासनाने १२ जून २०२६ रोजी माहिती...

खतरनाक कारनामा..! नीट परीक्षेच्या विद्यार्थ्याला चक्क परदेशातील दिले परीक्षा केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त नागपूर :-काही कालावधीपासून पेपरफुटी तसेच शिक्षणाच्या आयचा घो होत असल्याने होतकरू विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य धोक्यात येऊ लागले आहे.पालक वर्ग आपली मुले शिकून...

तीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-अनेकांना वाटतेय की,एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून पैश्याची रक्कम घेतली,तर आपले नाव वा आपली करणी उजेडात येणार नाही.पण,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसला...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!