Friday, June 19, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमोठी बातमी सुरक्षा दल-नक्षल चकमकीत ३१ नक्षली ठार तर दोन जवान...

मोठी बातमी सुरक्षा दल-नक्षल चकमकीत ३१ नक्षली ठार तर दोन जवान शहीद; चकमक सुरूच..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये आज,रविवार सकाळपासून चकमक सुरू असून चकमित सुरुवातीला १२ नक्षल्यांचा खात्मा झाल्याचे वृत्त समोर आले होते तर आता अधिकृत माहितीनुसार विजापूरच्या राष्ट्रीय उद्यान परिसरात झालेल्या चकमकीत आतापर्यंत ३१ नक्षलिंचा खात्मा करण्यात आला असून दोन जवान शहीद तर दोन जवान जखमी झाले आहेत,त्यांना पुढील उपचारासाठी हेलिकॉप्टरने रायपूरला पाठवण्यात आले आहे.उपचाराकरिता चार जवांनाना नेत असतांना वाटेतच दोन जवान शहीद झाल्याची माहिती आहे.सदरची चकमक ही छत्तीसगडच्या बिजापूर आणि नारायणपूरला लागून असलेल्या महाराष्ट्र सीमेवरील उद्यानात झाली.सुरक्षा दलाकडून शोध मोहिमे दरम्यान चकमकीच्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर स्वयंचलित शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.डीआरजी बिजापूर, एसटीएफ, सी-६० चे जवान परिसरात शोध मोहीम राबवत आहेत. आज सकाळपासून सुरू असलेल्या चकमकीत गोळ्यांच्या आवाजाने परिसर बेजार झाले आहे.चकमक थांबण्याचे नाव घेत नसल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाल्याचे वृत्त आहे.अजूनही चकमक सुरूच आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गडचिरोली हे भविष्यात देशातील महत्त्वाचे औद्योगिक व पोलाद उत्पादन केंद्र म्हणून...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात,अशी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!