Saturday, April 18, 2026
Homeमुंबईआता बँकांकडून मिळणारे कर्ज स्वस्त होण्याची शक्यता..

आता बँकांकडून मिळणारे कर्ज स्वस्त होण्याची शक्यता..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-बँकांकडून मिळणारे वाहनकर्ज तसेच गृहकर्ज सर्वसामान्यांना न परवडणारे आहे.त्यातच आता रिझर्व्ह बँकेने पाच वर्षांनंतर पहिल्यांदाच व्याजदर कपातीचा निर्णय घेतला आहे.रिझर्व्ह बँकेने याआधी रेपो दरातील व्याजदर कपात मे २०२० मध्ये केली होती.यानंतर आता फेब्रुवारी २०२५ मध्ये रिझर्व्ह बँकेने रेपो दरात व्याजदर कपात केली आहे.या निर्णयामुळे बँकांकडून मिळणारे गृहकर्ज,वाहनकर्ज आदी प्रकारची कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे.
रिझर्व्ह बँकेच्या सहा सदस्यांच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीने आज,शुक्रवार ७ फेब्रुवारीला रेपो दरात पाव टक्का व्याजदर कपात केली आहे.यामुळे रेपो दर  ६.५० टक्क्यांवरुन ६.२५ टक्क्यांवर आला आहे.केंद्र सरकारने नव्या करप्रणालीनुसार वार्षिक १२ लाख रुपयांचे उत्पन्न करमुक्त केल्याचे जाहीर केले.या घोषणेला काही दिवस होत नाहीत तोच रिझर्व्ह बँकेने रेपो दरात पाव टक्का व्याजदर कपात केली आहे.या लागोपाठच्या निर्णयांमुळे देशातील आर्थिक उलाढालींना चालना मिळण्याची शक्यता वाढली आहे.देशाचा आर्थिक विकासदर ६.७ टक्के राहील आणि घाऊक बाजारपेठेतील महागाईचा दर हा ४.२ टकक्यांच्या आसपास राहील असा अंदाज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी जाहीर केला आहे.त्यामुळे आता गृहकर्ज,वाहनकर्ज स्वस्त होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोहफुले वेचत असतांनाच बिबट्याचा हल्ला.. – जंगलशिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीटातील एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

उष्णतेचा कहर; उद्याला नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वाढत्या उष्णतेच्या लाटेचा कहर लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या,शनिवार १८ एप्रिल रोजी नागपूर...

खताचा काळाबाजार भोवला; देसाईगंजच्या कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत(DAP)अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे,खताचा काळाबाजार करणे तसेच शासकीय ई-पॉस(e-POS) प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्रचे संचालक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!