Saturday, September 5, 2026
Homeनागपूरएकाला मोबाईलसाठी हटकले म्हणून विष प्राशन केले तर दुसऱ्याला अभ्यासाचा तणाव आल्याने...

एकाला मोबाईलसाठी हटकले म्हणून विष प्राशन केले तर दुसऱ्याला अभ्यासाचा तणाव आल्याने गळफास घेतला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :-आजच्या युवा पिढीचे काही खरे नाही,कोण, कुठला निर्णय घेणार हे सांगताच येत नसल्याने पालकांनी काय करावे? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.त्यातच नागपूरच्या पारडी व जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.एकाला मोबाईलसाठी हटकले म्हणून विष प्राशन केले तर दुसऱ्याला अभ्यासाच्या तणावामुळे गळफास घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.अनुष्का तुलसीदास लांडगे ही अकरावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी होती.तिचे वडील ड्रायव्हर आहेत. तर आई गृहिणी आहे.तिला एक लहान भाऊ देखील आहे.पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,अनुष्का मोबाईल फोन पाहत असल्याने तिच्या पालकांनी तिला मोबाईल पाहण्याऐवजी अभ्यास करण्याचा सल्ला दिला होता.यानंतर काही वेळातच अनुष्काने  कीटकनाशक प्राशन केले.तिची प्रकृती खालावल्याने तिला रुग्णालयात नेले असता तिला मृत घोषित करण्यात आले.त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.तिच्या आत्महत्येचे नेमके कारण समोर येऊ शकलेले नाही.मात्र,तिने मोबाईल न दिल्याच्या संतापातून हे टोकाचे पाऊल उचलले का या दिशेने तपास सुरू आहे.दुसरी घटना जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.जरीपटका येथील अमरज्योती नगरमध्ये ही घटना घडली.१५ वर्षांचा प्रणव किरणकुमार बोरकर हा दहावीचा विद्यार्थी होता.त्याचे वडील बँकेत कर्मचारी आहेत.पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ,प्रणवची परीक्षा २८ फेब्रुवारीपासून सुरू होणार होती. त्याचे प्रीलिमचे दोन पेपर तो देऊ शकला नव्हता. अभ्यासाला घेऊन तो काहीशा तणावात होता.शिवाय मागील काही कालावधीपासून त्याच्यातील रागीटपणा वाढला होता.घटनेच्यावेळी तो बाथरूममध्ये गेला.तो बराच वेळ बाहेर न आल्याने त्याच्या आईने हाक मारली.तिला शंका आल्यावर तिने पतीला सांगितले. जेव्हा ते घरी पोहोचले आणि दरवाजा तोडला तेव्हा तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला.ते पाहून पालकांनी एकच हंबरडाच फोडला.त्यानुसार जरीपटका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!