- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था द्वारा संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे )नागरिक आरोग्य रक्षक संस्था,केयर क्लिनिक,अम्मा क्लिनिक,लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्था देसाईगंज यांच्या संयुक्त विद्यमाने देसाईगंजच्या कमलानगर येथील रफी अहेमद किदवाई मेमोरीयल हायस्कुल याठिकाणी येत्या २ फेब्रुवारीला सकाळी १० ते २ वाजे पर्यंत भव्य रोगनिदान तथा उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सदर शिबिरात रक्तदाब,ब्लड शुगर, सतत येणारा ताप,किडनीचे आजार,हृदय रोग,अशक्तपणा, वारंवार चक्कर येणे,जुनाट हृदय रोग,छातीत दुखणे, धाप लगणे,छातीत धडधड करणे इत्यादी,नेत्र रोग निदाणामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तीरळेपणा,इत्यादी, हायड्रोशील,हर्निया,अंगावरील गाठी,आतड्यांचे आजार मुतखड्याचे आजार,पोटाचे आजार,गलगंड (थायराईड)इत्यादी,स्त्रिरोगांमध्ये मासिक पाळीचे आजार,पांढरे पाणी जाने,महिलांचे इतर आजार, बालरोग यामध्ये हृदयाला छिद्र असणे,मतिमंद, मुलांच्या विकासा संबंधी आजार तसेच कुपोषण, लहान मुलांचे सर्व आजार,अस्थीरोग,संधिवात, मणक्यात असणारी ग्याप,वाकलेले पाय,फ्रॅक्चर तसेच हाडांचे सर्व आजार,त्वचा रोग खाज,गचकरण, अंगावरील पांढरे डाग,त्वचेचे सर्व रोग,श्वसन रोग,दमा, बरेच दिवसचा खोकला,तोंडावाटे पडणारे रक्ताचे ठसे इत्यादी सर्व रोगांची तज्ञ् डॉक्टरांकडून तपासणी व उपचार करण्यात येणार आहे.सदर शिबिरामध्ये निवड झालेल्या रुग्णांची हेल्प एज इंडिया च्या वतीने मोफत सश्त्रक्रिया करण्यात येणार असून सदर आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजक लतीफ शेख,राजेश गढरिया,नवेद पटेल,योगेश नेवारे,लतीफ रिजवी,मछिंद्र मुळे,अजमत खान सह जावेद शेख यांनी केले आहे.
- Advertisement -

