Saturday, May 2, 2026
Homeकुरखेडा'त्या' विद्यार्थ्याच्या मृत्यूचे कारण अजूनही गुलदस्त्यात.. - कुरखेडा सती नदीपात्रातील मृतदेह आढळल्याचे...

‘त्या’ विद्यार्थ्याच्या मृत्यूचे कारण अजूनही गुलदस्त्यात.. – कुरखेडा सती नदीपात्रातील मृतदेह आढळल्याचे प्रकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहराच्या कुंभीटोला मार्गावरील सार्वजनिक नळ योजनेच्या विहीरीपासून काही अंतरावर असलेल्या सती नदीपात्रात एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा शनिवार २५ जानेवारीला सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.रोहीत राजेंद्र तूलावी वय २० वर्षे रा.जैतपूरटोला ग्रामपंचायत गोठणगांव, ता.कुरखेडा असे नदीपात्रात आढळून आलेल्या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
घटनेच्या दिवशी शनिवारी सकाळच्या सुमारास मॉर्निंग वॉकला(शारीरिक कसरत) जाणाऱ्या काही नागरिकांना सती नदी पात्रात कुणीतरी झोपलेल्या अवस्थेत दिसून आला.त्यानुसार नागरिकांनी जवळ जाऊन बघितले असता,एक मुलगा मृतावस्थेत दिसून आला.नागरिकांनी याबाबत कुरखेडा पोलिसांना माहिती दिली.कुरखेडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार महेन्द्र वाघ यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला.कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.रोहितच्या अंगावर कोणत्याही जखमा नसल्या तरी घटनास्थळी उलटी केल्याचे निदर्शनास आले होते.त्यामुळे त्याने विष प्राशन केले असावे,अशी शंका नाह्रिकांकडून व्यक्त केली जात आहे.रोहीतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्याचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण कळू शकेल,असे कुरखेडा पोलिसांनी स्पष्ट केले आहे.रोहित मागील दोन वर्षापासून पोलिस भरतीची तयारी करीत होता. त्यामुळे सर्वच घटना संशयपद असल्याचे परिसरातील नागरिकांकडून बोलण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींना मोठा झटका; लाखो महिला अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक कुटुंबांसाठी आधार देणारी व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारी महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने जुलै-२०२४ पासून सुरू केलेली 'मुख्यमंत्री-माझी लाडकी...

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!