Saturday, May 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता सर्व जमीन मालक शेतकऱ्यांचे आधार नंबर सातबारा उताऱ्यास होणार लिंक..

आता सर्व जमीन मालक शेतकऱ्यांचे आधार नंबर सातबारा उताऱ्यास होणार लिंक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-केंद्र सरकारच्या ॲग्रीस्टॅक या नव्या योजनेद्वारे देशातील सर्व जमीन मालक शेतकऱ्यांचे आधार नंबर सातबारा उताऱ्यांस जोडून माहिती एकत्रित करण्यात येत आहे.आधारकार्ड साताबारा उतारा संलग्नतेचे काम पूर्ण झाल्यावर केंद्र आणि राज्य शासनाच्या शेतकऱ्यांकरिता असलेल्या सर्व योजनांचा लाभ शेतकऱ्यांना विनाविलंब उपलब्ध करुन देणे शक्य होणार आहे.
महाराष्ट्र राज्यात २१ जानेवारी २०२५ च्या आदेशान्वये ॲग्रीस्टॅक उपक्रमाच्या अंमलबजावणी करिता विशेष कॅम्प आयोजित करण्याच्या सूचना सर्व जिल्हा प्रशासनांना देण्यात आल्या आहेत.ॲग्रीस्टॅक अंतर्गत आधार नंबर व पत्ता,पॅन कार्ड,जमीन मालकी,बँक खाते ही सर्व माहिती एकत्र करून अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने विश्लेषण करणे सहज शक्य होणार आहे.कमाल जमीन धारणा कायद्याप्रमाणे जमीन घेण्यास मर्यादा असून जास्तीत जास्त १८ एकर बागायत जमीन घेता येते.जिरायत जमिनीला मर्यादा आहे.ॲग्रीस्टॅक योजनेच्या अंमलबजावणीमुळे शेतकऱ्यांना शासन योजनेचे लाभ जसे सत्वर मिळू शकणार आहेत,त्याच बरोबर दुसरा फायदा म्हणजे, देशात कुणाकडे,कुठे आणि किती जमीन आहे,याची सर्व माहिती सरकारला मिळणार आहे.ॲग्रीस्टॅक प्रकल्पात वरकरणी केवळ शासकीय योजनाचा लाभ घेण्यासाठी याचा उपयोग होईल,असे दिसत असले तरी त्याचे अनेक दूरगामी फायदे होणार असून, बेकायदा जमीन खरेदी-विक्री आणि बेकायदा अमर्याद जमीनधारण करणे यांस आळा बसणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!