Saturday, May 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनोटीस बजावण्यासाठी व्हॉट्सॲप,इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा वापर करू नये- सर्वोच्च न्यायालय

नोटीस बजावण्यासाठी व्हॉट्सॲप,इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा वापर करू नये- सर्वोच्च न्यायालय

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-पूर्वी पत्रव्यवहार वा इतर पत्रे पाठविण्यासाठी जी-मेलचा सर्वात जास्त वापर व्हायचा.हल्ली जी-मेलच्या वापरासह व्हॉट्सॲप तथा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी पत्रव्यवहाराने जागा धरली आहे.अशातच आता सर्वोच्च न्यायालयाने व्हॉट्सॲप किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नोटीस पाठवण्यास बंदी घातली आहे.सर्वोच्च न्यायालयाने पोलिस विभागांना सीआरपीसीच्या कलम ४१अ किंवा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम ३५ अंतर्गत संशयित आरोपींना नोटीस बजावण्यासाठी व्हॉट्सॲप किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा वापर करू नये,असे निर्देश न्यायमूर्ती एमएम सुंदरेश आणि राजेश बिंदल यांच्या खंडपीठाने दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, संशयित आरोपींना पोलिसांनी पारंपारिक पद्धतीनेच नोटीस जारी केल्या पाहिजेत.दखलपात्र गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला प्रथम संशयिताला हजर राहण्यास सांगणारी नोटीस बजावावी लागेल. संशयित व्यक्ती पोलिस अधिकाऱ्यासमोर हजर झाला आणि तपासात सहकार्य केले तर त्याला अटक केली जाणार नाही. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी त्यांच्या पोलिस यंत्रणेला बीएनएसएस २०२३ ने निश्चित केलेल्या मानकांनुसारच नोटीस बजावण्याचे आदेश द्यावेत.
खंडपीठाने असेही स्पष्ट केले की,व्हॉट्सॲप किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवलेली नोटीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) २०२३ ने ठरवलेल्या मानकांची पूर्तता करीत नाही. ॲड.लुथरा यांनी या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या निर्णयाचा हवाला दिला.या निर्णयात, सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांना फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) च्या कलम ४१अ चे पालन न करता एखाद्या व्यक्तीला अटक करण्यापासून रोखले होते.या व्यक्तीने असा गुन्हा केला होता ज्यासाठी त्याला सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकली असती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींना मोठा झटका; लाखो महिला अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक कुटुंबांसाठी आधार देणारी व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारी महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने जुलै-२०२४ पासून सुरू केलेली 'मुख्यमंत्री-माझी लाडकी...

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!