- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा गावापासून पश्चिमेस तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मेंढा वैनगंगा नदी घाटातून बेसुमार कोट्यवधी रुपयांचा अवैध वाळू उपसा प्रकरणी देसाईगंज तहसील कार्यालयासमोर मागील महिन्याच्या ३० डिसेंबर २०२४ पासून नामदेव वसाके यांचेसह सत्यवान रामटेके यांनी बेमुदत ठिय्या आंदोलन पुकारले आहे.बेमुदत ठिय्या आंदोलनाला काल,शुक्रवारी १२ दिवस लोटूनही देसाईगंज महसूल विभागाचे वतीने अवैध वाळू उपसा प्रकरणी दिलेल्या मागण्या संदर्भात कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही.त्यामुळे दिलेल्या मागण्या संदर्भात तात्काळ कारवाई करावी; अन्यथा येत्या पुढील दिवसांत दिलेल्या मागण्यासंदर्भात गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करून जिल्हा प्रशासनाचे डोके खाजविणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी काल,शुक्रवारी १० जानेवारीला दिलेल्या पत्रकावरून दिसून येत आहे.
- Advertisement -

