- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-शासकीय नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना परीक्षेत गुण वाढवून देण्याच्या बहाण्याने प्राचार्याने चक्क शरीर सुखाची मागणी केल्याची घटना गुरुवारी २६ डिसेंबरला भंडारा येथील शासकीय नर्सिंग कॉलेजमध्ये उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली.याबाबत पालकांना कळताच त्यांनी प्राचार्याला जाब विचारत चांगलेच झोडपले होते.किरण मुरकुट असे पालकांनी झोडपलेल्या प्राचार्याचे नाव आहे.
भंडारा येथे शासकीय नर्सिंग कॉलेज असून त्या ठिकाणी शेकडोच्या वर प्रशिक्षणार्थी ए एन एम (ANM)आणि जे एन एम (JNM) चे प्रशिक्षण घेतात.त्यातील काही विद्यार्थिनींना प्राचार्यांनी परीक्षेत पास करण्यासाठी गुण वाढवून देतो,अशी बतावणी करून काही मुलींना त्यांच्या व्हॉट्सॲपवर मॅसेज पाठवत शरीरसुखाची मागणी केली होती.त्यातील काही पीडित मुलींनी सदर प्राचार्याची तक्रार त्यांच्या पालकांना केली.त्यानुसार विद्यार्थिनींचे संतप्त पालक नर्सिंग कॉलेजमध्ये दाखल झाले.पालकांनी प्राचार्याला याबाबत विचारणा केली असता,त्याने सुरुवातीला उडवाउवीची उत्तरे दिली.त्यामुळे संतप्त पालकांनी प्राचार्याला झोडपून काढले होते.त्यानुसार अटकेत असलेल्या प्राचार्य किरण मुरकुट याची काल,शुक्रवारी २७ डिसेंबरला न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.पोलिसांनी त्याची पोलिस कोठडीची मागणी न्यायालयाकडे केली होती; मात्र ती फेटाळून ९ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
भंडारा शहरातील शासकीय परिचर्या प्रशिक्षण विद्यालयात एएनएमच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनींसोबत हा प्रकार घडला आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अधीनस्त असलेल्या या महाविद्यालयात किरण मुरकुट मागील दोन वर्षांपासून प्राचार्य पदावर कार्यरत आहे.या काळात त्याच्या वर्तनाबद्दल विद्यार्थिनींमध्ये चर्चा सुरू असतांनाच हे प्रकरण पुढे आले.पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करून अटक केली होती. त्यानंतर काल शुक्रवारी दुपारी त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर दुपारी ३ वाजता प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी हिंगणघाटे यांच्या न्यायालयात हजर केले.पोलिसांनी तपासासाठी प्राचार्याच्या पोलिस कोठडीची मागणी केली.मात्र,मोबाइल जप्तीसह अन्य सोपस्कार पार पाडल्यामुळे न्यायालयाने पोलिसांची मागणी फेटाळून ९ जानेवारी २०२५ पर्यंत प्राचार्यास न्यायालयीन कोठडी मंजूर केली आहे.
- Advertisement -

