Tuesday, July 28, 2026
Homeनागपूरऑटो रिक्षा अपघातात अंगणवाडी सेविकेसह मुलाचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू..

ऑटो रिक्षा अपघातात अंगणवाडी सेविकेसह मुलाचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :-वाढदिवसाचे कार्यक्रम आटोपून स्वतःच्या ऑटो रिक्षाने घरी परत येत असतांना वाटेतच रात्रीच्या सुमारास भरधाव ऑटो दुभाजकावर धडकली आणि ऑटो रस्त्यावर पलटी झाला.त्यामुळे चालक रोहित आणि मागच्या प्रवासी सीटवर बसलेली त्याची आई करुणा दोघांनाही डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना नागपूर शहराच्या हिंगणा-एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.यात २५ वर्षीय मुलासह आईचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला.रोहित गोपाल साखरे वय २५ वर्षे आणि त्याची आई करुणा गोपाल साखरे वय ४९ वर्षे अशी मृतकांची नावे आहेत.रोहित हा ऑटो चालक असून त्याची आई करुणा साखरे ही अंगणवाडी सेविका होती.मुलगा रोहित आणि त्याची आई रोहितच्या चुलत बहिणीकडे वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गेले होते. त्यानंतर घरी परततांना वाटेतच दुर्दैवी घटना घडली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला व दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत विविध जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्याने कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी...

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!