- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-येत्या ६ नोव्हेंबर रोजी नागपूर येथे संविधान संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरचे संमेलन ओबीसी युवा अधिकार मंचच्या वतीने करण्यात आले असून सदर कार्यक्रमास काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित असणार आहेत.ओबीसी युवा अधिकार मंच व अनिल जयहिंद यांनी राहुल गांधींना या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले असून हा नॉन पॉलिटिकल कार्यक्रम असल्याचे स्पष्टीकरण काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.विजय वडेट्टीवार यांनी याबद्दलची माहिती पत्र परिषद घेत दिली.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की,नागपूर येथे येत्या ६ नोव्हेंबर रोजी संविधान संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.या संविधान संमेलनामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी हे सहभागी होणार आहेत.राहुलजींना ओबीसी युवा अधिकार मंचच्या वतीने निमंत्रण दिले होते.त्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करून राहुलजी यांनी या संविधान संमेलनामध्ये सहभागी होण्याचे मान्य केले असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.
- Advertisement -

