- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-बकऱ्या धुण्यासाठी घराच्या मागे असलेल्या विहिरीतून पाणी काढतांना तोल गेल्याने शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल,गुरुवारी ३१ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास पोंभूर्णा तालुक्यातील डोंगर हळदी माल येथे घडली.गणपत मार्कडी लेनगुरे वय ७० वर्षे असे मृताचे नाव आहे.ऐन दिवाळीच्या सणातच शेतकऱ्याच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
शेतकरी गणपत लेनगुरे हे आपल्या बकऱ्या धुण्यासाठी घरामागील विहिरीतून पाणी काढत होते. विहिरीला कठडे नसल्याने पाणी काढतांना अचानक तोल गेल्याने ते विहिरीत कोसळले.माहिती मिळताच लोकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला.मात्र,यश आले नाही.खोल पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला.पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून आकस्मिक मृत्यूची नोंद केली.मृताच्या पश्चात पत्नी,मुलगा व मोठा अप्त परिवार आहे.घटनेचा पुढील तपास उमरी पोतदारचे ठाणेदार राहुल गुहे यांच्या मार्गदर्शनात नरेंद्र खोब्रागडे करीत आहेत.
- Advertisement -

