Saturday, April 18, 2026
Homeचंद्रपूर५५ वर्षीय महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू...

५५ वर्षीय महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-झाडू बनविण्यासाठी झाडण्या तोडण्यासाठी नदीकाठावरील जंगलात गेलेल्या ५५ वर्षीय महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज, शनिवारी ३० नोव्हेंबरच्या सकाळी उघडकीस आली. रेखाबाई मारोती येरमलवार असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
सावली वनपरिक्षेत्रा अंतर्गत व्याहाड खुर्द उपवन परिक्षेत्रातील, सामदा बुज. बिटातील निलंसनी पेठगाव येथील रहिवासी रेखाबाई मारोती येरमलवार ही महिला काल २९ नोव्हेंबर रोजी झाडण्या कापण्यासाठी निलंसनी पेठगावला लागून असलेल्या वैनगंगा नदीकाठावरील जंगलात गेली होती. नदीलगतच्या नाल्याजवळ झाडण्या कापत असतांना दबा धरून असलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला केला आणि तिचा मृत्यू झाला.ती सायंकाळ घरी परत आली नाही; त्यामूळे मुलगा महादेव येरमलवार,राकेश येरमलवार व गावकऱ्यांनी रात्री तिचा शोध घेतला, परंतु शोध लागला नाही.
या घटनेची माहिती वनविभागास देण्यात आली. सामदा बिटाचे वनरक्षक आणि पीआरटीचे कार्यकर्ते आकाश चुदरी,छगन बोरकुटे,प्रफुल्ल गेडाम,इंदारशाह पेंदाम,मंगेश कांबळे यांनी गावाशेजारी गस्त घातली. रात्रीच्या सुमारास वाघ गावातील जिल्हा परिषद शाळेला लागून असलेल्या बालाजी कात्तलवार यांचे घराशेजारी आल्याने पीआरटीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून त्यास हाकलून लावले.
आज सकाळी वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक परमेश्वर खेडकर,वनपरिक्षेत्राधिकारी विनोद धुर्वे, क्षेत्र सहाय्यक आर.एम.सूर्यवंशी,क्षेत्र सहाय्यक राजू कोडापे,बिट वनरक्षक बी.के.सोनेकर,आर.एस.डांगे आणि गावकऱ्यांनी पुन्हा शोध घेतला असता,वैनगंगा नदीकाठावरील जंगलात महिलेचा मृतदेह आढळून आला.वनविभागाने मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठविले.मृतकाच्या कुटुंबीयांना तात्काळ २५ हजार रुपयांची मदत देण्यात आली.या घटनेने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

मोहफुले वेचत असतांनाच बिबट्याचा हल्ला.. – जंगलशिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीटातील एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!