Wednesday, June 3, 2026
Homeकोंढाळाकोंढाळा जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक लालचंद धाबेकर यांचा सेवानिवृत्तीपर निरोपीय सत्कार समारंभ...

कोंढाळा जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक लालचंद धाबेकर यांचा सेवानिवृत्तीपर निरोपीय सत्कार समारंभ…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोंढाळा(गडचिरोली):- देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक लालचंद धाबेकर हे नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने आज,शनिवार दिनांक-३० नोव्हेंबरला कोंढाळा जिल्हा परिषद शाळेत आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम, ग्रामपंचायतीच्या सरपंचा अपर्णा राऊत,उपसरपंच गजानन सेलोटे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील पारधी,पोलीस पाटील किरण कुंभलवार, माजी पंचायत समिती सभापती परसराम टिकले,माजी उपसभापती नितीन राऊत,सामाजिक कार्यकर्ते अरुण कुंभलवार,प्रतिष्ठित नागरिक सीताराम धोटे,बौद्ध समाजाचे अध्यक्ष शिशुपाल वालदे,निखिल गोरे, ग्रामपंचायतीचे सदस्य,शाळेचे मुख्याध्यापक योगेश ढोरे,शिक्षक संतोष टेंभूर्णे,शिक्षिका माधुरी रामगुंडे, शाळेतील संपूर्ण शिक्षकवृंद,शालेय विद्यार्थी,शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी,गावातील प्रतिष्ठित नागरिक तथा उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या वतीने धाबेकर यांचा सपत्नीक निरोपीय सत्कार समारंभ पार पडला.
सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धाबेकर यांचे सपत्नीक शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.त्यानंतर उपस्थित विविध मान्यवर तथा शिक्षक वृंदांनी धाबेकर यांच्या बद्दलची मनोगते व्यक्त केली.
शिक्षक लालचंद धाबेकर हे अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी असून शिस्तप्रिय तथा विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत.शाळेची,विद्यार्थ्यांची,समाजाची प्रगती कशी होईल यासाठी ते नेहमी धडपड असतात.ती धडपड आम्ही सर्वांनी जवळून बघितली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडणारे शिक्षक लालचंद धाबेकर सर यांचा आज सेवानिवृत्तीपर निरोप समारंभ आहे.सर्व विद्यार्थी शिक्षक,उपस्थित मान्यवरांना आज जड अंतकरणाने लालचंद धाबेकर सरांना निरोप द्यावा लागत आहे. पुढील सर्व आयुष्य सुख समृद्धीचे भरभराटीचे, आनंदाचे जावो अशी ईश्वर चरणी प्रार्थना.असे सेवानिवृत्तपर शुभेच्छा देत कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक योगेश ढोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर शिक्षक लालचंद धाबेकर यांना विद्यार्थ्यांनी विविध भेटवस्तू देऊन त्यांचा आशीर्वाद घेत सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या.
प्रसंगी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार रामदास मसराम यांनी शिक्षक धाबेकर यांचा सपत्नीक पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.आमदार यांनी म्हटले की,धाबेकर सर यांनी केलेले कार्य हे केवळ त्यांच्यातच मर्यादित नाहीत तर सर्वांसाठी एक मोठा आदर्श आहे.शालेय शिक्षणापासून ते सामाजिक कार्यात त्यांनी स्वतःला झोकून अग्रस्थान मिळविले आहे.आज ते वयोमनापरत्वे निवृत्त जरी झाले असले तरीही त्यांनी केलेले कार्य वाखाणण्याजोगे आहे. अष्टपैलू असे व्यक्तिमत्वाचे धनी असलेल्या धाबेकर सरांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आपले जीवन आनंदमय,सुखमय होवो अश्या शुभेछ्या दिल्या. कोंढाळा गावातील तसेच आरमोरी विधानसभा क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी मी निरंतर प्रयत्नशील आहे; असे प्रसंगी आमदार मसराम यांनी उपस्थितांना संबोधित केले.सेवानिवृत्तीपर निरोपीय सत्कार समारंभ प्रसंगी आमदार मसराम यांनी जिल्हा परिषद शाळेतील नव्याने बांधण्यात आलेल्या एका नवीन वर्ग खोलीचे उद्घाटन केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका माधुरी रामगुंडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन शिक्षक संतोष टेंभूर्णे यांनी केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी...

गोदाम बांधकाम,तेल काढणी युनिट,कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिटसाठी लाखो रुपयांपर्यंत अनुदान.. – बना स्वतःच मालक; ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील भुईमूग,करडई,तीळ यांसारख्या तेलबिया पिकांचे तसेच तूर,हरभरा व इतर कडधान्यांचे उत्पादन वाढविण्यासोबतच त्यांचे मूल्यवर्धन आणि शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी...

शाळेची पहिली घंटा वाजणार ‘या’ दिवशी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील वाढती उष्णता लक्षात घेता यंदा शाळेची पहिली घंटा उशिरा सुरू होण्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून यंदा २०२६-२७ या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!