- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यात एक धक्कादायक घटना आज,बुधवार २४ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.एका २० वर्षीय तरुणाने अभ्यासाच्या तणावात राहत्या घरीच सीलिंग पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथे घडली.अनुराग अनिल बोरकर वय २० वर्षे,रा.नवरगाव,ता.सिंदेवाही, जि.चंद्रपूर असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
अनुराग बोरकर हा अभ्यासात हुशार विद्यार्थी होता.त्याने नुकतीच नीट यूजी २०२५ परीक्षेत ९९.९९ टक्के गुण मिळवून ओबीसी प्रवर्गातून १४७५ वी रँक पटकाविली होती.त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक झाले होते.उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस प्रवेशासाठी जाणार होता.तत्पूर्वीच त्याने टोकाचे पाऊल उचलत जीवनयात्रा संपविली.राहत्या घरीच गळफास घेतल्याने सदरची माहिती सिंदेवाही पोलिसांना देण्यात आली.त्यानुसार सिंदेवाही पोलीसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला.घटनास्थळी अनुरागने लिहिलेली एक सुसाईड नोट सापडली असून सुसाईड नोटमध्ये अभ्यासाचे ताण असल्याने आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे.त्यानुसार सिंदेवाही पोलिसांनी मर्ग दाखल करून पुढील चौकशी सुरू केली आहे.
- Advertisement -

