Sunday, July 26, 2026
Homeभंडारा१२५ दिवस लोटूनही भातपीक हाती आलेच नाही; शेवटी भरपाईसाठी ग्राहक मंचाकडे धाव..

१२५ दिवस लोटूनही भातपीक हाती आलेच नाही; शेवटी भरपाईसाठी ग्राहक मंचाकडे धाव..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-लागवड केलेल्या भातपीकाचा कालावधी लोटूनही पीक हाती आले नसल्याने शेतकऱ्यांची फसगत झाल्याचे लक्षात येताच संबंधित शेतकऱ्यांना ग्राहक तक्रार मंचाकडे धाव घ्यावी लागले असल्याचा प्रकार भंडारा जिल्ह्यात उघडकीस आला आहे.
भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील मांगली चौरस येथे कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.मांगली चौरस येथील काही शेतकऱ्यांनी आसगाव येथील एका कृषी केंद्रातून रब्बी हंगामासाठी बियाणे खरेदी करून भातपीकाची लागवड केली.पीक लागवडीसाठी केदार सीड्स कंपनीच्या के एस गोल्ड नावाचे भात पिकाचे वाण खरेदी केले होते.या पिकाचे उत्पादन १०० दिवसात येण्याचे कंपनीकडून तसेच सदरचे भात पिकाची लागवड केल्यानंतर १०० दिवसात त्याचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळणार असल्याची बतावणी कृषी केंद्र संचालक आणि कंपनीकडून सांगितल्या गेली होते. मात्र,१२५ दिवस लोटूनही भातपीक हातीच आलेले नाही.उलट शेतकऱ्यांना या भात पिकासाठी आणखी २० ते २५ दिवस वाट पाहावी लागणार आहे.अर्थात पीक उत्पादन हाती येण्यास विलंब होत असल्याने खरीप हंगामासाठी शेती तयार करण्यास देखील विलंब होत आहे.सदरच्या प्रकाराबाबतची तक्रार कृषी विद्यापीठ आणि कृषी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.यानंतर एका कृषी तज्ञांच्या टीमने पिकाची पाहणी केली.यात त्यांनी दिलेल्या अहवालानंतर आता शेतकऱ्यांची फसगत झाल्याचे लक्षात आले.त्यामुळे शेतकऱ्यांनी आर्थिक नुकसान भरपाई मिळावी; यासाठी ग्राहक तक्रार निवारण मंचात धाव घेत दाद मागण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतातील सागवानाची ५०० झाडे जळून खाक; विद्युत वितरण कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका..

उद्रेक न्युज वृत्त :-यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक आपल्या न्याय हक्काचा लढा नेहमी लढतांना दिसून येतात.ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेत शेतकरी साहित्यातील त्रुटी असोत वा...

अखेर विद्यार्थी आंदोलनाचा मोठा विजय; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा.

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून राजधानीतील जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आज...

नशामुक्त युवा विकसित भारत’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन.. – विजेत्या स्पर्धकांना जिल्हास्तरीय पारितोषिकांसह राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या मेरा युवा भारत(MY Bharat) उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या "नशामुक्त युवा विकसित भारत" या राष्ट्रव्यापी अभियानाच्या...

‘डायल ११२’ वर खोटी माहिती देत असाल तर सावधान; कारावासासह दंडाची शिक्षा.. – खोटी माहिती दिल्याने तरुणावर गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :- 'डायल ११२' हा भारत सरकारचा आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक आहे.याद्वारे आपत्कालीन परिस्थितीत पोलिस व इतर काही महत्त्वाच्या सेवा एकाच नंबरवर जलद...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!