- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-काही कारणास्तव झालेल्या भांडणातून ४२ वर्षीय व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या घरातील टिव्ही व कारची तोडफोड केल्याने संतापलेल्या २४ वर्षीय तरुणाने सायकलच्या लोखंडी गिअरने मानेवर वार करून संबंधिताची निघृण हत्या केली होती.प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश-२ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश भारती काळे यांनी खटल्याचा निकाल देतांना आरोपीस जन्मठेपेच्या शिक्षेसह ५ हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली आहे.सदरची घटना ही भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी येथील गांधी वॉर्डात घडली होती.आकाश विजय श्रीपाद वय २४ वर्षे असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.तर गंगाधर नथ्थू निमजे वय ४२ वर्षे,रा.गांधी वॉर्ड,मोहाडी असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,२७ ऑक्टोंबर २०२१ रोजी दुपारी मृत गंगाधर निमजे यांनी आरोपी आकाश याच्या घरी जाऊन टीव्ही आणि कारची तोडफोड केली होती.याच रागातून आरोपी आकाशने गंगाधर यांच्या घरी जाऊन सायकलच्या लोखंडी गिअरने त्यांच्यावर जोरदार प्रहार केला.या गंभीर हल्ल्यात गंगाधर यांचा जागीच मृत्यू झाला होता. मृताची पत्नी विद्या निमजे यांच्या तक्रारीवरून मोहाडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.न्यायालयीन प्रक्रिया आणि पुरावे तत्कालीन तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांनी प्रकरणाचे पुरावे गोळा केले आणि न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता रजनी मेहेर यांनी बाजू मांडली. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि वैद्यकीय पुराव्यांच्या आधारे आरोपीवरील गुन्हा सिद्ध झाला.न्यायालयाने आरोपीला दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.दंड न भरल्यास त्याला अतिरिक्त सहा महिने कारावास भोगावा लागणार आहे.
- Advertisement -

