- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-३१ वर्षीय तरुणाचे लग्न जुळले.लग्न जुळल्याने स्वतःच्या लग्नाच्या पत्रिका मित्र मंडळी तसेच नातेवाईकांना वाटण्यासाठी काही दिवसांपूर्वी तो ब्रम्हपुरी येथे गेला.त्यातच पत्रिका वाटून झाल्याने त्याने आई-वडिलांना मी घरी येतो माझा स्वयंपाक करून ठेवा म्हणून फोनही केला.मात्र,आठ ते नऊ दिवस लोटूनही तो घरी परतलाच नसल्याने कुटुंबीयांची चिंता वाढलेली आहे.विनोद मनोहर बोरकर वय ३१ वर्षे,रा.नांदगाव, ता.सिंदेवाही, जि.चंद्रपूर असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे.सदर तरुणाचे वडील मनोहर नागोजी बोरकर हे धानाचे व्यापारी आहेत.मनोहर यांच्या मुलाचे लग्न जुळल्याने काही ठिकाणी तो स्वतःच लग्न पत्रिका वाटत होता.अशातच गुरुवारी २० मार्चला ब्रम्हपुरी येथे पत्रिका वाटण्यासाठी गेल्यानंतर विनोद हा अजून पावेतो घरी परतला नाही.त्यामुळे शंका-कुशंका वाढीस लागून कुटुंबीय चिंताग्रस्त झाले आहेत.
- Advertisement -

