Thursday, September 3, 2026
Homeदेसाईगंजसंपूर्ण महाराष्ट्रात एक नवा आदर्श.. देसाईगंज शहरात आंतरजातीय सत्यशोधक विवाह सोहळा संपन्न......

संपूर्ण महाराष्ट्रात एक नवा आदर्श.. देसाईगंज शहरात आंतरजातीय सत्यशोधक विवाह सोहळा संपन्न… – सागर वाढई संग सावी टेंभूरकर विवाह बंधनात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठी व्यापारी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या देसाईगंज शहरात नुकताच एक अनोखा व आगळा-वेगळा आंतरजातीय सत्यशोधक विवाह सोहळा संपन्न झाला.नव दाम्पत्यांच्या कुटुंबीयांनी आंतरजातीय विवाहास बाद्य तथा विरोध दर्शविणाऱ्या तथाकथितांच्या नाकावर लिंबू टिच्चून संपूर्ण महाराष्ट्रात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
देसाईगंज शहरात सतत सामाजिक क्षेत्रात अतुलनीय कार्य करणारे व हजारो रुग्णांना रक्तपुरवठा करून आरोग्य सेवा जपणारे देसाईगंज ओबीसी समाज संघटनेचे शहराध्यक्ष तथा छत्रपती शिवाजी क्लबचे संस्थापक-अध्यक्ष सागर वाढई यांनी अंधश्रध्दा व ब्राम्हणी व्यवस्थेला नाकारुन महापुरुषांचे विचार अंगिकारून सागर वाढई व सावी टेंभूरकर यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या सत्यशोधक पद्धतीने आंतरजातीय विवाह सोहळा पार पाडला.
गौतम बुद्ध,जिजामाता,तुकाराम महाराज,सावित्रीमाई फुले,महात्मा फुले,शाहु महाराज,बिरसा मुंडा,डॉ. बाबासाहेब आंबेडकर,संत तुकडोजी महाराज,संत गाडगे महाराज यांच्या विचारांची प्रेरणा घेत जुन्या धार्मिक, अंधश्रध्दा,रुढी परंपरेला मुठमाती देत देसाईगंज शहराच्या हनुमान वार्ड येथील पुष्पा व निसर्गविलीन मारोती वाढई यांचे सुपुत्र सागर वाढई यांचा विवाह देसाईगंज शहरातीलच कस्तुरबा वार्ड येथील रहिवासी छाया व अरविंद टेंभूरकर यांची  सुकन्या सावी टेंभूरकर हिचेशी रविवार २३ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आंतरजातीय सत्यशोधक विवाह सोहळा हजारो समाज बांधवाच्या उपस्थितीत मोठ्या थाटात संपन्न झाला.
सागर वाढई हे ओबीसी समाजातील तर सावी टेंभूरकर ह्या अनुसूचित जाती समाजातील आहेत.विवाहासाठी दोघांचेही परीवार,सामाजिक कार्यकर्ते व मित्रपरीवारांनी प्रयत्न केलेत.पार पडलेल्या विवाह सोहळ्याची सुरूवात महापुरुषांच्या प्रतीमेचे पूजन व दिप प्रज्वलन करुन वधूवरांचे आईवडील,बहिण-भाऊजी,मामा-मामी यांचे स्वागत व परीचय सत्यशोधक विधीकर्ते सुनिल कावळे यांनी करून दिला.त्यानंतर वऱ्हाडी ईष्टमित्रांसह पाहुणे मंडळींच्या उपस्थितीत वंदना घेण्यात आली.वधु-वरांच्या हातात हार देवुन मंगलाष्टकाला सुरुवात करण्यात आली, मंगलाष्टके झाल्यानतर उपस्थीतांनी वधू-वरांवर फुलांचा वर्षाव करुन वधुवराला शुभेच्छा देण्यात आल्या.आंतरजातीय सत्यशोधक विवाह सोहळ्याचे विधीकर्ते सुनिल कावळे यांनी विधीवत पार पाडून सत्यशोधक विवाह सोहळ्याबद्दल मार्गदर्शन केले.वधु -वरांना सुनिल कावळे,आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम,परसराम टिकले,धनपाल मिसार,दामोदर शिंगाडे,दिलीप नाकाडे,वीरेंद्र मोहुर्ले, भीमराज पात्रीकर,सुधाताई चौधरी,गुरुदास बोरुले, कमलेश बारस्कर,मोरु मोहुर्ले,ओबीसी समाज संघटना तसेच मित्र मंडळी यांचे हस्ते नवदाम्पत्यास सन्मानपत्र तथा क्रांतिकारक मायबाप ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वैवाहिक जीवनाच्या वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!