Tuesday, August 18, 2026
Homeभंडारास्वतःच्या दुकानातून ग्रामपंचायतीला साहित्य पुरवठा; गमावला सरपंच पद..

स्वतःच्या दुकानातून ग्रामपंचायतीला साहित्य पुरवठा; गमावला सरपंच पद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवण्यापूर्वी ‘मी ग्रामपंचायतीचा ठेकेदार नाही’ वा ‘ग्रामपंचायतीकडून कुठल्याही प्रकारचा कंत्राट,आर्थिक लाभ घेणार नाही’ असे लेखी हमीपत्र नामनिर्देशन अर्ज सादर करतांना द्यावे लागते.अश्यातही अनेकजण ग्रामपंचायतीकडून लाभ वा आपल्या फायद्यासाठी पदाचा दुरूपयोग करतांना दिसून येतात.मात्र,एखाद्या चेल्याला गुरू भेटला तर मालकाची जिरवल्याशिवाय राहत नाही.पण,याठिकाणी ना चेला,ना मालक केवळ पुराव्यानिशी तक्रारच महत्वाची ठरली आहे.स्वतःच्या मालकीच्या दुकानातून ग्रामपंचायतीला बांधकाम साहित्य पुरवठा करून कंत्राटाच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळवल्याप्रकरणी पवनी तालुक्याच्या अड्याळ ग्रामपंचायतीचे सरपंच शिवशंकर मुंगाटे यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (ग) मधील तरतुदींचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी सरपंच आणि सदस्य पदावरून अपात्र घोषित केले आहे.
अड्याळ ग्रामपंचायतीचे सरपंच शिवशंकर मुंगाटे यांच्या मालकीची ‘प्रनिश ट्रेडर्स’ नामक दुकान आहे.त्यामुळे, आपलीच ग्रामपंचायत व आपलीच दुकान असल्याने ग्रामपंचायतीला बांधकाम साहित्य व इतर साहित्य पुरवण्याचे काम करण्यात येत होते.याबाबत चिंतामण शेषराव वाघमारे यांनी पुराव्यासह तक्रार दाखल केली होती.त्यानुसार,सरपंच या जबाबदार पदावर असतांना मुंगाटे यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करून कंत्राटी कामातून आर्थिक नफा मिळवल्याचे तपासात निष्पन्न झाले.सरपंच पदावर निवडून येण्यापूर्वी आणि त्यानंतरही त्यांनी या कंत्राटांच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळवला होता.त्यातच,निवडणूक प्रतिज्ञापत्रात वस्तुस्थिती लपवून शासनाची दिशाभूल केली.सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरही मुंगाटे यांनी आपल्या पदाचा प्रभाव वापरून प्रनिश ट्रेडर्सची विविध देयके बेकायदेशीरपणे उचलल्याचे सिद्ध झाल्याने मुंगाटे यांना पदावरून पायउतार व्हावे लागले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अल्पवयीन मुलाने शाळकरी मुलाची केली हत्या..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-भंडारा शहरातून आज,मंगळवार १८ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून एका शाळकरी मुलाच्या हत्येने संपूर्ण शहर हादरून...

सर्पदंश घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या वारसांना आणखी प्रत्येकी ५ लाखांचे अर्थसहाय्य मंजूर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या तीन विद्यार्थिनींच्या कायदेशीर वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी ५...

नामांकित शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल; पोलिस यंत्रणा सतर्क.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपुरातील नामांकित शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल आज,मंगळवार १८ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास शाळांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर दिसून येताच शिक्षण...

जिल्हाधिकारी व एसपी रात्रीच पोहचले मार्कंडा देवस्थान परिसरात; विकास व संवर्धन कामांची केली पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देवस्थान परिसरात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी)आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग(एएसआय) यांच्यामार्फत सुरू असलेल्या कामांची जिल्हाधिकारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!