Thursday, September 10, 2026
Homeभंडाराअन् संतप्त लाडक्या बहिणींनी अडवला महामार्ग; दोन महिन्याचा लाभ मिळालाच नाही..!

अन् संतप्त लाडक्या बहिणींनी अडवला महामार्ग; दोन महिन्याचा लाभ मिळालाच नाही..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे  नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचे लाभ पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.मात्र, राज्यातील अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात दोन पैकी एकाही महिन्याची रक्कम जमा जमा झालेली  नाही. यामुळे ज्या महिलांना लाभ मिळाला नाही; अश्या महिलांनी सरकार विरोधात संताप व्यक्त केला आहे. अश्यातच आज,शनिवार १७ जानेवारी रोजी भंडारा जिल्ह्यातील महिलांनी संताप व्यक्त करून संतप्त लाडक्या बहिणींनी चक्क भंडारा शहरातील नागपूर नाका परिसरात मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवत ठिय्या आंदोलन केले.यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे खोळंबून ठप्प झाल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. अचानक झालेल्या या चक्काजाम आंदोलनामुळे महामार्गावरून जाणाऱ्या अवजड वाहनांसह खासगी वाहनेही अडकून पडली होती.आंदोलन करणाऱ्या महिलांनी सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करून नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचे पैसे खात्यात कां जमा झाले नाहीत? असा थेट सवाल  उपस्थित केला.महानगरपालिका निवडणुकीआधी दोन महिन्यांचे मानधन एकाचवेळी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते,मात्र प्रत्यक्षात अनेक महिलांना एकही हप्ता मिळालेला नाही,अशी ओरड महिलांनी केली.महिलांनी महामार्ग रोखल्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून पोलिस आणि प्रशासकीय अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.अधिकाऱ्यांनी महिलांशी संवाद साधत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.प्रशासनाच्या आश्वासनानंतर आणि समजावणी केल्यानंतर अखेर महिलांनी आंदोलन मागे घेतले.त्यानंतर काही वेळातच महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप..!

उद्रेक न्युज वृत्त :-युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने उद्या,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी एक दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली...

राज्यस्तरीय ज्युनियर ‘कुंग फू’ स्पर्धेत वांगेपल्ली शाळेच्या मोहनला कांस्यपदक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पुणे येथे पार पडलेल्या २४ व्या राज्यस्तरीय 'ज्युनियर वुशू स्पर्धा-२०२६' मध्ये अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली येथील शासकीय निवासी शाळेचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी...

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!