Thursday, August 6, 2026
Homeनवी दिल्लीस्पॅम मेसेज आणि कॉल्समुळे वैतागले असाल तर यापासून लवकरच होणार सुटका…-अनोळखी कॉलचे...

स्पॅम मेसेज आणि कॉल्समुळे वैतागले असाल तर यापासून लवकरच होणार सुटका…-अनोळखी कॉलचे आता दिसणार नाव; लागू होणार नवा नियम..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नवी दिल्ली :- अनोळखी नंबरवरून येणारे स्पॅम मेसेज आणि कॉल्समुळे देशभरातील ग्राहक वैतागले आहेत.स्मार्टफोन वापरणाऱ्यांना अनोळखी कॉलर ही एक डोकेदुखी बनली आहे.यावर उपाय म्हणून आता ‘ट्राय’ नवा नियम आणणार असून, सर्व मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्यांना कॉलर आयडी प्रणाली सक्रिय करण्यास सांगण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षांत स्मार्टफोनमध्ये अनोळखी नंबरवरून येणारे स्पॅम मेसेज आणि कॉल्सची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. आजकाल सर्व स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी अज्ञात कॉलर ही एक मोठी समस्या बनली आहे. जर तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल; तर तुम्ही लवकरच यापासून सुटका मिळवू शकता. ‘ट्राय’ लवकरच या समस्येवर तोडगा आणणार आहे.एका अहवालानुसार, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ‘ट्राय’ अशी प्रणाली आणण्याच्या तयारीत आहे, ज्यामध्ये देशातील जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि बीएसएनएल या सर्व कंपन्यांना कॉलर आयडी प्रणाली लवकरात लवकर सक्रिय करण्यास सांगितले आहे.जेणेकरून स्मार्टफोन वापरकर्त्यांना कॉल उचलण्यापूर्वीच कळू शकेल. ‘ट्राय’ने आपल्या कॉलर आयडी प्रणालीला कॉलिंग नेम प्रेझेंटेशन (सीएनपी) असे नाव दिले आहे. कॉलर आयडी प्रणालीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते तुमच्या फोनवर अशा लोकांची नावेदेखील प्रदर्शित करेल, ज्यांचे नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह केलेले नाहीत. म्हणजे अनोळखी नंबरवरून तुम्हाला कोणी कॉल केला, तर तुम्हाला त्याचे नाव कळेल.

अहवालानुसार, ‘सीएनपी’ सेवा डीफॉल्टनुसार सक्रिय होणार नाही. ही सेवा सुरू करण्यासाठी ग्राहकांना त्यांच्या टेलिकॉम ऑपरेटरकडे विनंती करावी लागेल. त्यानंतरच ती सेवा सुरू होईल. ‘ट्राय’ची ही सेवा फसवणूक आणि अनोळखी कॉलच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी खूप मदत करू शकते.

सध्या कॉलर आयडी ओळखण्यासाठी काही ॲप उपलब्ध आहेत.त्यातील काही सशुल्क आहेत.’ट्राय’ने आता थेट मोबाईल कंपन्यांनाच ‘सीएनपी’ सुरू करण्याचे निर्देश दिल्याने या खासगी ॲपसमोर संकट निर्माण होईल.हे खासगी ॲप कॉलरचे नाव दाखवण्यासाठी फोन नंबरचा डेटा मिळवतात.त्यातून डेटा सुरक्षिततेबाबतही अनेक प्रश्न निर्माण झाले होते. आता या सर्वांनाच चाप बसणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

प्राप्त तक्रारींची दखल; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर पातागुडम-सोमनपल्ली महामार्गाच्या दुरुस्तीला गती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेबाबत नागरिकांकडून सातत्याने प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या निर्देशानंतर राष्ट्रीय महामार्ग...

सरकारने सरसकट थकबाकी द्यावी; अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन.. – कंत्राटदार आक्रमक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सरकार केलेल्या कामांची थकबाकी देत नाही; पण नवीन कामे करवून घेत आहे.अश्यातच राज्यभरात विविध विभागातील कामांच्या सुमारे ९० हजार कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे त्रस्त...

देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा,कोरची व इतर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांच्या बदल्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांसह उपपोलिस ठाणे व पोलिस मदत केंद्रांतील तब्बल ७२ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत.या संदर्भात काल बुधवारी...

खासगी हॉस्पिटल्सचा संप; रुग्ण सेवा प्रभावित..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी)'सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी' (सीसीएमपी)पूर्ण केलेल्या होमिओपॅथी(बीएचएमएस) डॉक्टरांना नोंदणी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यभरातून वैद्यकीय असंतोषाचा वणवा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!