Monday, September 21, 2026
Homeनवी दिल्लीसोने-चांदीचे सीमा शुल्क १५ टक्क्यांवरून ६ टक्के..-सोने-चांदी होणार स्वस्त…अर्थसंकल्पात सरकारने कररचनेतही केला...

सोने-चांदीचे सीमा शुल्क १५ टक्क्यांवरून ६ टक्के..-सोने-चांदी होणार स्वस्त…अर्थसंकल्पात सरकारने कररचनेतही केला बदल…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नवी दिल्ली :- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी ३.० सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज सादर  केला आहे.या अर्थसंकल्पात सीतारामन यांनी पायाभूत सुविधा,कृषी,महिला,रोजगार,शिक्षण या क्षेत्रांच्या विकासासाठी भरीव तरतूद केली आहे. दरम्यान,या अर्थसंकल्पात सरकारने कररचनेतही बदल केला आहे.तसेच सोने आणि चांदीवरील सीमा शुल्कात कपात केली आहे.या निर्णयामुळे आता सोने आणि चांदी हे धातू स्वस्त होणार आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून केंद्र सरकारच्या या अर्थसंकल्पाची चर्चा होती या अर्थसंकल्पात सोने- चांदीचा दर कमी होण्यासाठी काही करतूद होणार का? असे विचारले जात होते.दरम्यान,आज प्रत्यक्ष अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोने-चांदीच्या दराबाबत खुशखबर मिळाली आहे.सरकारने सोने- चांदीच्या सीमा शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.याआधी सोने-चांदीचे सीमा शुल्क १५ टक्के होते.आता यात कपात करून सीमा शुल्क थेट ६ टक्क्यांवर आणण्यात आला आहे.म्हणजेच सरकारने सीमा शुल्क थेट अर्ध्यापर्यंत कमी केले आहे. त्यामुळे आता या मौल्यवान धातूंची किंमतही कमी होण्याची शक्यता आहे.

सोने,चांदीवरील सीमा शुल्क – ६ टक्के

प्लॅटिनमवरील सीमा शुल्क- ६.४ टक्के

अमोनिअम नायट्रेटवरील सीमा शुल्क ७ टक्क्यांवरून १० टक्के करण्यात आले आहे.

नव्या कररचनेत नवे काय ?👇

स्टँडर्ड डिडक्शन ५० हजारांवरुन ७५ हजारांवर

३ लाखांपर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री

३ ते ७ लाख उत्पन्न ५ टक्के आयकर

७ ते १० लाख उत्पन्न १० टक्के आयकर

१० ते १२ लाख उत्पन्न १५ टक्के आयकर

१२ ते १५ लाख उत्पन्न २० टक्के आयकर

१५ लाखांवर उत्पन्न ३० टक्के आयकर

दरम्यान,गेल्या काही महिन्यांमध्ये सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ झालेली आहे.सोन्याचा भाव थेट एक लाखांपर्यंत जातो की काय? अशी शंका काही दिवसांपूर्वी व्यक्त केली जाऊ लागली.सोने या धातूपासून लोक दागिने बनवितात.सोने महागल्यामुळे सामन्य लोकांना दागिने खरेदी करणे अवघड झाले होते.पण आता सीमा शुल्कात घट होणार असल्यामुळे लवकरच सोने आणि चांदी स्वस्त होणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!