- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-सहलीकरीता गेलेल्या दोन युवकांचा जलाशयाच्या अतिरिक्त पाण्याच्या कालव्यात बुडून मृत्यू झाला असल्याची घटना काल,बुधवारी सायंकाळच्या सुमारास चुलबंद जलाशय परिसरात घडली.कादीर मतीन शेख वय २८ वर्षे,केफ अमीन शेख वय २१ वर्षे, दोघेही रा.सडक अर्जुनी अशी मृतांची नावे आहेत.
बुधवारी अनु.जाती,जमाती प्रवर्गाच्या वतीने भारत बंदची हाक देण्यात आली होती.या अनुषंगाने गोंदिया जिल्ह्यातही कडकडीत बंद पाळण्यात आला.सुट्टीचा आनंद घेण्यासाठी दोघेही गोरेगाव तालुक्यातील चुलबंद जलाशय येथे सहलीला गेले होते.दरम्यान, चुलबंद जलाशयाचे अतिरीक्त पाणी वाहून जाणाऱ्या कालव्याजवळून जात असताना दोघांपैकी एकाचा तोल कालव्यात गेला.डोह मोठा व खोल असल्याने त्यात बुडत असताना दुसरा वाचविण्यासाठी धावला. पण यात दोघांचाही बुडून मृत्यू झाला.ही बातमी वाऱ्यासारखी मुरदोली गावात पसरली.नागरिकांनी या कालव्याकडे धाव घेतली.घटनेची माहिती पोलीस पाटील दिलीप मेश्राम व वनपरिक्षेत्र अधिकारी यांना देण्यात आली.पोलीस पाटील मेश्राम यांनी गोरेगाव पोलिसांना माहिती दिली.मात्र,सदर घटनास्थळ डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने याची सुचना डुग्गीपार पोलिसांना देण्यात आली.परंतु भारत बंद आंदोलनामुळे पोलीस बंदोबस्तात व्यस्त होते.त्यामुळे सायंकाळच्या सुमारास स्थानिक मासेमारांच्या मदतीने दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.सदर घटनेची नोंद डुग्गीपार पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
- Advertisement -

