Monday, September 21, 2026
Homeनवी दिल्लीसरकारविरोधात लेखन केले म्हणून पत्रकारांवर गुन्हे दाखल करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय

सरकारविरोधात लेखन केले म्हणून पत्रकारांवर गुन्हे दाखल करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नवी दिल्ली :-केवळ सरकारवर टीका केली म्हणून पत्रकारांवर गुन्हे दाखल करता येणार नाहीत; असा महत्त्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात काल,सोमवारी दिला.या निर्णयामुळे पत्रकारांना दिलासा मिळाला आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारकडून विशिष्ट जातींना झुकते माप देऊन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जात असल्याचे वृत्तांकन एका पत्रकाराने केले होते.त्यामुळे उत्तर प्रदेश पोलिसांनी या पत्रकारावर गुन्हा दाखल केला होता.या पत्रकाराने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती ऋषीकेश रॉय आणि एस.व्ही.एन.भट्टी यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली.याप्रकरणी न्यायालयाने उत्तर प्रदेश पोलिसांना संबंधित पत्रकारांवर कारवाई न करण्याचे आदेश दिले.
न्यायालयाने म्हटले की,लोकशाहीप्रधान देशात प्रत्येक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर राखला पाहिजे. राज्यघटनेतील कलम १९(१) (ए) नुसार पत्रकारांच्या अधिकारांना संरक्षण प्राप्त झाले आहे.त्यामुळे सरकारविरोधात लेखन केले म्हणून पत्रकारांवर गुन्हे दाखल करता येणार नाही.पत्रकार अभिषेक उपाध्याय यांच्या वतीने वकील अनुप प्रकाश अवस्थी यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याचा आधार घेऊन किरकोळ कारणावरून उत्तर प्रदेश पोलिसांनी उपाध्याय यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचे अवस्थी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्वतःला परमेश्वराचा अवतार मानत असून नोकरशाहीत जाती आधारित नियुक्त्या करीत असल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!