Monday, July 13, 2026
Homeगडचिरोलीमुली नंतर काही तासातच वडिलांनीही घेतला गळफास... - गडचिरोली जिल्ह्यातील हृदयाला धडकी...

मुली नंतर काही तासातच वडिलांनीही घेतला गळफास… – गडचिरोली जिल्ह्यातील हृदयाला धडकी भरवणारी घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या मुलचेरा तालुक्यातील लक्ष्मीपूर येथे हृदयाला धडकी भरवणारी घटना उघडकीस आली आहे.प्रेमीयुगुलाने एकाच दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी ६ ऑक्टोंबर रोजी सायंकाळच्या सुमारास मुलचेरा तालुक्यातील लक्ष्मीपूर येथे उघडकीस आली होती.या घटनेचा पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात रवाना केले होते.अशातच आत्महत्या करणाऱ्या मुलीच्या विरहात पित्यानेही गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविल्याने एकच खळबळ उडाली.अमित अनिल रॉय वय ४० वर्षे, रा.विजयनगर असे मृत पित्याचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की,मुलचेरा तालुक्यातील लक्ष्मीपूर येथील जयदेव मिलन मंडल वय २० वर्षे व विजयनगर येथील अमेला अमित रॉय वय १८ वर्षे हे प्रेमीयुगूल शनिवारी ५ ऑक्टोंबरला घरातून गायब झाले होते. दरम्यान रात्रीच्या सुमारास त्यांनी लक्ष्मीपूर येथील शेतकऱ्याच्या शेतातील झोपडीत गळफास लावून आत्महत्या केली.सदरची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस येताच लक्ष्मीपूर गावात एकच खळबळ निर्माण झाली होती.मुलचेरा पोलिसांनी घटनास्थळ गाठत दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले होते.अशातच मुलीने आत्महत्या केल्याची माहिती प्राप्त होताच पिता अमित अनिल रॉयही घरातून गायब झाले होते.मुलचेरा पोलिसांद्वारे त्यांचाही शोध घेतला जाता असताना मोबाल ट्रॅकिंगवरून त्यांचे लोकेशन सापडले.याअंतर्गत पोलिसांनी शोधमोहीम राबविली असता रविवारी त्याच रात्रीच्या सुमारास विजयनगर गावालगतच्या जंगलात झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला.
जयदेव मंडल व अमेला रॉय या प्रेमीयुगुलांनी तरुण वयात गळफास लावून आत्महत्या केल्यानंतर काही तासाच्या अवधीतच मुलीच्या चित्याला अग्नी न देताच मुलीच्या विरहात बापानेही आपली जीवनयात्रा संपविली.दोन कुटुंबातील तिघांचा जीव गेल्याने दोन्ही कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!