Monday, July 13, 2026
Homeनागपूरविविध राज्यातील हजारो नागरिक दीक्षा ग्रहण करीत बुद्धाचा प्रकाशमार्ग धरणार...

विविध राज्यातील हजारो नागरिक दीक्षा ग्रहण करीत बुद्धाचा प्रकाशमार्ग धरणार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ साली ऐतिहासिक दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि धार्मिक अवडंबराद्वारे हजारो वर्षे प्रगतीची वाट रोखलेल्या शोषित,पीडितांना बुद्धाचा प्रकाश मिळाला.त्या ऐतिहासिक घटनेचे महत्त्व असलेल्या दीक्षाभूमीवर म्हणूनच दरवर्षी विविध राज्यांतील हजारो लोक धम्म दीक्षा ग्रहण करतात.यावर्षीही २५ राज्यांतील हजारो नागरिक दीक्षा ग्रहण करीत बुद्धाचा प्रकाशमार्ग धरणार आहेत.
ऐतिहासिक दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याला आता वेग आला आहे.वेगवेगळ्या कामांची जय्यत तयारी केली जात आहे.दीक्षाभूमीवर दरवर्षी धम्मचक्र वर्धापनदिन प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यासह धम्मदीक्षेचाही कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर होतो.मागील काही वर्षांपासून भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वातील भिक्खू संघ हे दीक्षाभूमीवर दीक्षा समारंभ आयोजित करतात. यात बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यास इच्छुक असलेले लोक दीक्षा घेतात.त्यांना रीतसर बौद्ध धम्माचे प्रमाणपत्रही वितरित केले जाते.यंदासुद्धा मोठ्या
प्रमाणावर लोक दीक्षा घेणार आहेत.
राष्ट्रीय बौद्ध महासभा अंतर्गत यूपी,बिहार,झारखंड, जम्मू काश्मीर आदींसह २५ राज्यांतील हजारो लोक बौद्ध धम्माची दीक्षा घेणार आहेत.यासोबतच कर्नाटक येथून जवळपास ३५० बसेस भरून लोक दीक्षा घेण्यासाठी दीक्षाभूमीवर येणार आहेत.म्हैसूर कर्नाटक येथील सामाजिक कार्यकर्ते रविकीर्ती यांच्या नेतृत्वात कर्नाटकातून लोक दीक्षा घेण्यासाठी येणार आहेत.११ तारखेला ते पोहोचतील.१२ तारखेला बेझनबाग मैदानावर त्यांनी धम्म संमेलन आयोजित केले आहेत. तेथून ते दीक्षाभूमीवर रॅलीने येतील आणि दीक्षा घेतील. दीक्षाभूमीवरील यावर्षीचे मुख्य आकर्षण म्हणजे जपान येथील ५० लोकसुद्धा दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेणार आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!