Thursday, July 30, 2026
Homeभंडारासकाळी पंचायत समितीत शॉर्टसर्किटमुळे भीषण आग; महत्त्वाचे साहित्य जळून खाक.. - सुट्टी...

सकाळी पंचायत समितीत शॉर्टसर्किटमुळे भीषण आग; महत्त्वाचे साहित्य जळून खाक.. – सुट्टी असल्याने जीवितहानी टळली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर पंचायत समितीत आज,शनिवार २६ एप्रिलला सकाळी साडे सातच्या  दरम्यान शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागल्याने दस्तऐवज असलेल्या खोलीतील दस्तऐवज,संगणकीय उपकरणे, पंखे आणि इतर महत्त्वाचे साहित्य जळून खाक झाले.मात्र,आज कार्यालयाला शासकीय सुट्टी असल्याने जीवितहानी टळली.अशातच आगीच्या धुराने संपूर्ण इमारत अंधकारमय झाले होते.घटनेची माहिती कळताच स्थानिक नागरिक,अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने जोर लावीत आगीवर नियंत्रण मिळवले.पण खोलीतील संपूर्ण साहित्य आगीत भस्मसात झाले होते.सदर दस्तऐवज खोली पंचायत समितीच्या नवीन इमारतीत असून,या खोलीत १०६५ पासूनचे सर्व महत्त्वाचे कागदपत्र,विविध प्रकरणांचे रेकॉर्ड्स,प्रशासकीय फाईली सांभाळून ठेवण्यात आले होते.कर्मचाऱ्याच्या माहितीनुसार,खोलीत दरवाजे आणि खिडक्या पूर्ण बंद असतानाही पंखे सुरू होते. पंख्यांच्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.अशातच सदरची लागलेली आग शॉर्टसर्किटमुळे की अन्य कोणत्या कारणाने लागलीय,अश्या चर्चांना उधाण आले आहे.कारण काही भ्रष्ट अधिकारी,पदाधिकाऱ्यांच्या संदर्भातील चौकशीचे दस्तऐवज आगीत भस्मसात झाल्याने सदरची आग पूर्वनियोजित होती की काय?सदर घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी,अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज येथे स्काऊट-गाईड विषयावरील मार्गदर्शन व उजळणी वर्ग उत्साहात संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-भारत स्काऊट-गाईड्स जिल्हा कार्यालय गडचिरोली व जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक/माध्यमिक)गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच राजर्षी शाहू महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक...

आईसह दोन चिमुकल्या नदी व नाल्याच्या मधोमध अडकून पडल्या; धाडसी बचावकार्य..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात काल बुधवारी दिवसभर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पामुलगौतम नदीसह परिसरातील नाल्यांना अचानक पूर आल्याने लाहेरी येथील एकाच कुटुंबातील तीन...

तुकाराम मुंढेंनी शाळा व्यवस्थापनावर सोपवली मोठी जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विविध निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईचे सत्र सुरू असतांनाच आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...

माझा वाढदिवस-एक झाड उपक्रम; देसाईगंज आदर्श महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि वृक्षारोपणाची सवय प्रत्येकामध्ये रुजावी या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,देसाईगंज येथे "माझा वाढदिवस-एक झाड" हा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!