Sunday, April 19, 2026
Homeदेसाईगंजअखेर कोंढाळाच्या सिंद्राई रेती घाटावर फडकल्या सिमांकन झेंड्या... - उपसरपंचाकडून रेती घाटाची...

अखेर कोंढाळाच्या सिंद्राई रेती घाटावर फडकल्या सिमांकन झेंड्या… – उपसरपंचाकडून रेती घाटाची पाहणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथील सिंद्राई रेती घाटावर बुधवार २३ एप्रिल रोजी प्रत्यक्ष रेती घाटातील केलेल्या पाहणीवरून वाळू उपसा होत असतांना कुठून कुठपर्यंत वाळूचे उत्खनन होणार आहे; याबाबत सिमांकन झेंड्या नसल्याने कंत्राटदाराच्या दिवाणजीने तसेच गावातील तलाठीने एकच एक्झॅक्ट उत्तर दिले होते.दोघांनीही सिमांकन करण्यात आलेल्या झेंड्या मच्छीमारांनी उपटून नेल्या असल्याचे सांगितले. मात्र,रेती घाटाचा ताबा देत असतांनाच सर्वप्रथम कुठून-कुठपर्यंत रेतीचा उपसा करण्यात यावा,यासाठी रेती घाटावर झेंड्या नाही तर सिमेंट पोल गाळाने आवश्यक आहे व सदर रेती घाटाचा ताबा हा त्या महसूल विभागाच्या सर्कल मधील मंडळ अधिकारी देत असतो.मात्र,कोंढाळा येथील सिंद्राई रेती घाटात ना झेंड्या दिसतात,ना सिमेंट पोल दिसून येतात.अश्या आशयाचे वृत्त सर्वप्रथम ‘उद्रेक न्युज’ ने प्रसारित केले होते.अशातच आज,शनिवार २६ एप्रिलला कोंढाळा ग्रामपंचायतीचे उपसरपंच गजानन सेलोटे व ‘उद्रेक न्युज’ चे संपादक सत्यवान रामटेके यांनी सिंद्राई रेती घाटात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता सिमांकन झेंड्या लावण्यात आल्याचे दिसून आले.विशेष म्हणजे,सायंकाळी वृत्त अन् रात्रीच सिमांकन झेंड्या गाळण्यात आल्याची चर्चा सुरू होती.
पाहणी दरम्यान उपसरपंच गजानन सेलोटे कंत्राटदाराच्या संबंधित उपस्थितांना म्हणाले की, दरवर्षी ग्रामपंचायतीच्या वतीने रेती घाट तसेच इतर पांदन रस्त्यांवर मुरूम तसेच इतर साहित्य टाकून रस्ते दुरुस्ती केली जाते.त्याचा उपभोग आपण करीत असता.त्यामुळे मुख्य रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडतात.पावसाळ्यात शेतीचा हंगाम सुरू झाला की,शेतकऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते.शेतकऱ्यांना अश्या त्रासाला सामोरे जावे लागू नये,याकरीता रेतीची वाहतूक होत असलेल्या मुख्य मार्गांवर मुरूम टाकून रस्ते सुरळीत करण्यात यावे, असे प्रसंगी सेलोटे यांनी उपस्थितांना सांगितले.
अशातच झेंड्या तर लावण्यात आल्या,मात्र सिमांकन व्यतिरिक्त अवैध वाळू उपसा करण्यात आला त्याचे काय? सुरुवातीला भुईसपाट उपसा अन् आता त्यावर झाकली मूठ सव्वा लाखाची करून ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका प्रत्यक्ष पाहणी वरून निदर्शनास आल्याने महसूल विभाग एवढा गाढ झोपेत कसा?असा प्रश्न निर्माण झाला आहे.रेतीसाठी सर्वसामान्य नागरिकांना अनेक निर्बंध लादले जातात.मात्र, काहीजण लालसेपोटी सारे रान मोकळे करून सोडतात.अश्यांना वाटतेय की,समोरील व्यक्ती हा अळाणी आहे.आम्ही काहीही केले तरी चालेल,पण मूर्ख माणूसही एक दिवस शहाणा माणूस होत असतोच,हे विसरून चालणार नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

कहाणीमध्ये ट्विस्ट.! ना वाघ ना बिबट्या; घातपाताचा संशय.. – जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीट एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!