- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-शासनाच्या वतीने
संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण(DBT) मार्फत लाभार्थीच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येणार होती.मात्र,यांस विलंब झाल्याने योजनेच्या अनुदानाबाबत आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी शासनाकडे पाठपुरावा करून पोळ्यापूर्वी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा व्हावी; यासाठी प्रयत्न केलेत.त्यानुसार देसाईगंज तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेच्या तीन महिन्यांचे अनुदान तहसीलदार देसाईगंज यांना प्राप्त झाले असून पोळा सणापूर्वीच
लाभार्थ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी ४ हजार ५०० रुपये जमा होणार आहेत.
देसाईगंज तहसीलदार यांना तीन महिन्यांचे अनुदान प्राप्त होऊन तालुक्यातील एकूण-८,८४४ संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात मागील मे महिण्याचे अनुदान १ कोटी २७ लाख ९२ हजार ६०० रुपये वितरीत करण्यात आले आहे.त्यानुसार लाभार्थ्यांना प्रत्येकी १ हजार ५०० रुपये जमा झालेले आहेत.उर्वरित जून व जुलै या दोन महिन्यांचे अनुदान लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. त्यानुसार लाभार्थ्यांच्या बँक खात्यात आणखी ३ हजार रुपये जमा करण्यात येत असून पोळा सणापूर्वीच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा होणार असल्याने नक्कीच लाभार्थ्यांचा पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार; असे संजय गांधी निराधार योजनेचे देसाईगंज तालुकाध्यक्ष योगेश नाकतोडे यांनी सांगितले आहे.
- Advertisement -

