Sunday, September 6, 2026
Homeदेसाईगंजवंचित बहुजनांच्या हक्काचा लढा उभारणाऱ्या बाळासाहेबांना बळ द्या... - वंचित बहुजन आघाडीचे...

वंचित बहुजनांच्या हक्काचा लढा उभारणाऱ्या बाळासाहेबांना बळ द्या… – वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष कुशल मेश्राम

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातुन संपुर्ण महाराष्ट्रात अनुसूचित जाती, जमाती तसेच ओबिसींचे संवैधानिक अधिकार प्राप्त करुन देण्यासाठी सातत्याने लढा उभारणाऱ्या प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांना बळ देण्यासाठी सर्व समाज घटकांनी सहकार्य करावे; असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष कुशल मेश्राम यांनी केले आहे.
देसाईगंज येथील सिंधु भवन येथे आरमोरी विधानसभा क्षेत्रातिल वंचित बहुजन आघाडीचा भव्य पक्षप्रवेश व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला.या मेळाव्याला संबोधित करतांना कुशल मेश्राम म्हणाले की,कॉंग्रेस व भाजप सातत्याने एससी,एसटी ओबिसींची दिशाभुल करुन आरक्षण संपविण्याचे काम करित आहे.लोकसभा निवडणुकीत भाजपने संविधान बदलायचे आहे; असे वातावरण निर्माण केले तर कॉंग्रेसने या देशाचे संविधान वाचवायची ही शेवटची संधी असल्याचा भ्रम निर्माण केला. आंबेडकरी समाजाने या देशाचे संविधान वाचवायचे आहे म्हणून न मागता कॉंग्रेसला मतदान केले.जेव्हा सर्वोच्छ न्यायालयाने एससी,एसटी आरक्षणाचे वर्गिकरण करण्याचा व क्रिमिलेयर लावण्याचा निर्णय जाहिर केला; त्याची अंमलबजावणी कॉंग्रेसची सत्ता असलेल्या कर्णाटक व तेलंगाना राज्य  सरकारने  केली.मग कॉंग्रेस पक्ष एससी,एसटींचा हितचिंतक कसा असु शकतो; असा सवालही या प्रसंगी उपस्थित केला.वंचित बहुजनांना न्याय मिळवुन देण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर सातत्याने लढा उभारत असुन ओबिसींच्या आरक्षणात मराठ्यांनी ढवळाढवळ करु नये; यासाठीही लढा उभारत आहेत.आरमोरी विधानसभा क्षेत्रात वंचित बहुन आघाडीचा आमदार निवडुन देऊन बाळासाहेब आंबेडकरांना बळ द्यावे; असे आवाहनही या प्रसंगी केले.या कार्यक्रमात अनिल दहलानी,सरिता भैसारे यांचेसह ३० कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला.सोबतच आंबेडकरी चळवळित सतत कार्य करणाऱ्या ४० वयोव्रूद्ध कार्यकर्त्यांचा शाल श्रिफळ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला राज्य उपाध्यक्ष कुशल मेश्राम,  जिल्हाध्यक्ष बाळुभाऊ टेंभुर्णे,विधानसभा प्रभारी तथा जिल्हा महासचिव राजरतन मेश्राम,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रज्ञा निमगडे,जिल्हा संघटक भिमराव शेन्डे,जि.के.बारसिंगे,योगेन्द्र बांगरे,विलास केळझरकर, कवडु दुधे,नर्मदा मेश्राम,कोरची तालुकाध्यक्ष सुदाराम सहारे,अशोक कऱ्हाडे,कुरखेडा तालुकाध्यक्ष तुळशिराम नंदेश्वर,आरमोरी तालुकाध्यक्ष जगदिश दामले,देसाईगंजचे विनोद मेश्राम,आशिष घुटके,एन, आर,रामटेके,उद्धवराव खोब्रागडे,नानाजी कऱ्हाडे, लक्षमन नागदेवते,प्रविन रामटेके,उमाकांत बन्सोड, जगन बन्सोड,अभिमन्यु बन्सोड,शिवाजी मेश्राम, विनोद लांजिकर,ज्योती दहिकर यांचेसह वंचित बहुजन आघाडिचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अशोक मेश्राम यांनी केले.तर आभार प्रदर्शन शिवदास बन्सोड यांनी मानले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!