Thursday, September 3, 2026
Homeदेसाईगंजश्रीराम जन्मभूमी प्राण-प्रतिष्ठा समिती देसाईगंजची पूजित-अक्षता बैठक संपन्न….-गांवो-गांवी..घरो-घरी दिवाळी सारखा आनंदोत्सव होणार...

श्रीराम जन्मभूमी प्राण-प्रतिष्ठा समिती देसाईगंजची पूजित-अक्षता बैठक संपन्न….-गांवो-गांवी..घरो-घरी दिवाळी सारखा आनंदोत्सव होणार साजरा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज(गडचिरोली) :- विक्रम संवत २०८० पौष शुक्ल द्वादशी दिनांक- २२ जानेवरी २०२४ रोजी सोमवारला श्रीराम जन्मभूमी मंदिर अयोध्येतील भूतलाच्या गर्भगृहात श्रीरामाचे बाल स्वरूपाचे प्राण-प्रतिष्ठा होणार असून हिंदू-सनातन समाजाच्या गौरवान्वित ऐतिहासिक दिनाला देश भरात तसेच गांवो-गांवी..घरो-घरी दिवाळी सारखा आनंदोत्सव साजरा करण्याचे नियोजन होत असल्याने आज २४ डिसेंबर रोजी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीराम जन्मभूमी प्राण-प्रतिष्ठा समिती देसाईगंजची पूजित-अक्षता बैठक आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास आदर्श महाविद्यालय देसाईगंज याठिकाणी संपन्न झाली.

श्रीराम जन्मभूमी मंदिर अयोध्या करीता देश वासियांनी तन-मन धनाने निधी समर्पण करून मोलाचे सहकार्य केले.देश वासियांच्या सहकार्याने दिनांक- २२ जानेवरी २०२४ रोजी श्रीराम जन्मभूमी मंदिर अयोध्येतील भूतलाच्या गर्भगृहात श्रीरामाचे बाल स्वरूपाचे प्राण-प्रतिष्ठा होणार आहे.प्राण-प्रतिष्ठा पूर्वी अयोध्यावरून निमंत्रणाचे ” पूजित-अक्षता ” देसाईगंज (वडसा) तालुक्याला पोहचले असून सदर पूजित-अक्षता गांवो-गांवी… घरो-घरी… पोहचविण्या करिता आज पूर्व तयारी नियोजन बैठक आयोजित करून दिवाळी सारखा आनंदोत्सव सण साजरा करण्यात येणार आहे.देसाईगंज श्रीराम जन्मभूमी प्राण-प्रतिष्ठा पूजित-अक्षता समितीच्या बैठकी प्रसंगी जिल्हा मंत्री विहीप चंद्रपूर तथा जिल्हा अभियान प्रमुख श्रीराम मंदिर नियत क्षेत्र,अयोध्या स्थित ब्रम्हपुरीचे राजेंद्र ठाकरे, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे, जिल्हा मंत्री शैलेश तिवारी,अभियान प्रमुख शिध्येश दहिकर,सदर बैठकीस तालुक्यातील प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर पूजित-अक्षता बैठीकीचे आभार प्रदर्शन देसाईगंज भाजपा तालुक्याचे तालुकाध्यक्ष सुनीलभाऊ पारधी यांनी मानले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!