Thursday, July 30, 2026
Homeगडचिरोलीअखेर नवरगांव येथील प्रकरणावर निघाला तोडगा-फलकाला संविधान चौकाचे नाव…

अखेर नवरगांव येथील प्रकरणावर निघाला तोडगा-फलकाला संविधान चौकाचे नाव…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली/मुनिश्वर बोरकर :- चामोर्शी तालुक्यातील नवरगांव येथे आंबेडकर चौकाजवळ भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे फलक ग्रामसभेच्या ठरावानुसार लावण्यात आले होते. परंतु नवरगांव येथील जातीयवादी लोकांनी उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली व ठाणेदार चामोर्शी यांना फलक हटवा म्हणुन वारंवार तक्रार केल्यामुळे दि.२१ डिसेंबरला २०० पोलिसांनी फौज-फाट्या सहित फलक हटविल्यामुळे नवरगांवातील संपूर्ण बौध्द बांधव बैलबंडीने व पायदळ येऊन जिल्हा कचेरीवर मोर्चा वळवला होता. ज्या गावात आमचा वारंवार अपमान होतो; संविधान कर्त्याच्या नावाच्या फालकाला विरोध होतो.त्या गावात आम्ही राहुन उपयोग काय ? म्हणुन बौद्ध बांधव गावसोडून निघाले.दि.२२ डिसेंबरला जिल्हाधिकारी गडचिरोली यांना भेटून निवेदन देण्यात आले.परंतु तिथे काहीच तोडगा निघाला नाही.शेवटी आंदोलन कर्त्याचे मोरके मैदान सोडून पळाले.परंतु गेल्या दोन वर्षापासुन नवरगावची धुरा सांभाळणाऱ्या 

 नेत्यांच्या सामंजस्याने तोडगा काढण्याचे ठरविले आणि बौद्ध बांधवाचा मुंबईच्या दिशेने निघालेला कॉरवा अखेर थांबला.जिल्हाधिकारी संजय मिना  गडचिरोली,जिल्हा पोलीस आधिक्षक निलोप्पल गडचिरोली यांनी तोडगा काढण्यासाठी नवरगांव वासीयांना पाचारण केले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या नावाच्या फलका ऐवजी संविधान चौक अस्या नावाचे फलक लावण्याचे सर्वानुमते ठरविले. बाबासाहेब आंबेडकराच्या नावाला विरोध का?असे गावकर्‍यानी विचारले असता त्याचे उत्तर अधिकाऱ्यांकडून मिळाले नाही.सदर बैठकीला ॲड. विनय बांबोळे,वंचितचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे , रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्चर बोरकर,वंचितचे के. बारसीगे,रिपाईचे गोपाल रायपूरे,कविश्वर झाडे, डायमंड वाकडे,उपसरपंच्या करिश्मा वणीकर आदि उपस्थित होते.

Sanjay Meena, collector gadchiroli👇

Nawargaon,Chamorshi matter has been resolved peacefully and accepted by both communities in writing. Please be all advised to keep situation peaceful in district and allow harmony. Thank you

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा  दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील मालेगाव टाऊन परिसरात आज,गुरुवार ३० जुलै रोजी सकाळच्या...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे २५ मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नुकतेच दोन दिवसांपूर्वी नागपूरच्या  प्रादेशिक हवामान खात्याने गडचिरोली जिल्ह्यासाठी काल,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट,तर आज गुरुवारसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्यानुसार,जिल्ह्याच्या...

लाखो रुपयांचा विदेशी दारूसाठा जप्त; कार ठेवून पळाला आरोपी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अवैधरीत्या दारूची वाहतूक करणाऱ्या कारचा पाठलाग करण्यात आला.दरम्यान,चालकाने पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न केला खरी,पण त्याचा प्रयत्न...

ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी; …अन्यथा एसटी बसची मिळणारी सवलत होणार बंद..!

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड(NCMC)अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार,येत्या शनिवार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!