Wednesday, June 10, 2026
Homeगडचिरोली'त्या' चोरांना डॉ.बाबा साहेब आंबेडकर अजूनही कळलेले नाही?-बौद्ध बांधवांनी सोडले गाव; जिल्हा...

‘त्या’ चोरांना डॉ.बाबा साहेब आंबेडकर अजूनही कळलेले नाही?-बौद्ध बांधवांनी सोडले गाव; जिल्हा कचेरीवर दिली धडक-गडचिरोली जिल्ह्यातील घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- ज्या महामानवाने रात्रंदिवस एक करून; भारताचे संविधान लिहिले व सर्वांचे हित जोपासून राज्य घटना लिहिली; अशा महामानवाच्या केवळ नाम फलकाला घेऊन जातीय तेढ निर्माण केली जात असेल तर ही किती शरमेची व लाजिरवाणी बाब आहे.यावरून लक्षात येते की,अजूनही अनेकांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर कळलेले नसावे; अरे चोरांनो बीआर आंबेडकर हे केवळ दलीतांचेच नव्हते; तर सर्व जाती,पंथ व धर्माचे तसेच सर्व समावेशक होते.आजही काहीजण घुटण्यात अक्कल ठेवून बढावा करतांना दिसून येतात; असाच प्रकार हल्ली चिंधी चोरांच्या बाबतीत घडलेला दिसून येतोय.चामोर्शी तालुक्यातील नवरगाव येथील मुख्य चौकात लावलेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे फलक हटविण्यात आल्याने संतप्त बौद्ध बांधवाच्या ४० कुटुंबीयांनी गुरुवारी गाव सोडले होते.दरम्यान काल, शुक्रवार २२ डिसेंबर रोजी बौद्ध समाजातील आबालवृद्धांसह महिला,युवतींनी पायदळ जिल्हास्थळ गाठित थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी न्याय मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.मात्र तोडगा न निघाल्याने जोपर्यंत न्याय मिळत नाही,तोपर्यंत कार्यालयासमोरच ठिय्या देण्याचा निर्धार बौद्ध बांधवांनी घेतला आहे.त्यामुळे सदर प्रकरण अधिकच चिघळण्याची चिन्हे आहेत.

जिल्हास्थळापासून ३० किमी अंतरावर असलेल्या चामोर्शी तालुक्यातील नवरगाव येथे ४० बौद्ध कुटूंब वास्तव्याने आहेत.मागील अनेक वर्षापासून सदर समाजबांधव सुखी जीवन जगत असतांना मागील दीड वर्षापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फलकाला घेऊन दोन समाजात जातीय तेढ सुरु आहे. गावातील मुख्य चौकालगत बौध समाजवसती आहे. मागील वर्षी बौद्ध बांधवांनी मुख्य चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फलक लावण्यासाठी ग्रापं प्रशासनाला निवेदन सादर केले होते.ग्रापं प्रशासनाकडून फलक लावण्याची परवानगी मिळताच चौकात डॉ.आंबेडकर यांचे फलक लावण्यात आले. मात्र या फलकाला घेऊन विवाद सुरु झाला.सदर प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट असतांना २० डिसेंबर रोजी २०० पोलिस कर्मचा-यांच्या उपस्थितीत ग्रापं प्रशासनाने डॉ.आंबेडकर यांचे फलक हटविले. ग्रापं प्रशासनाच्या कारवाईमुळे बौद्ध बांधवांमध्ये नाराजीच सुरु उमटत होता.ग्रापं प्रशासनाने संमतीनंतरच फलक लावले असतांना ग्रापं प्रशासनानेच फलक का हटविले? असा प्रश्न उपस्थित करीत गावातील ४० कुटूंबातील जवळपास २०० समाजबांधवांनी गाव सोडून घरातील साहित्य बैलबंडीवर घेऊन काल, शुक्रवार थेट जिल्हाधिकारी कार्यालय काढले.यावेळी न्याय मागणीचे निवेदन जिल्हाधिका-यांना सादर करण्यात आले असून जोपर्यंत न्याय मिळणार नाही, तोपर्यंत जिल्हा केचरीवरील ठिय्या कायम ठेवण्याचा निर्धार बौद्ध बांधवांनी घेतला आहे. 

मुख्य चौकात ग्रा.पं. प्रशासन विरोधात नारेबाजी👇

नवरगाव येथील महिला, युवती तसेच बालकांना बौद्ध बांधवांनी बैलबंडीवर साहित्य गोळा करुन गाव सोडले. न्यायासाठी त्यांनी आज, शुक्रवारी थेट गडचिरोली जिल्हास्थळ गाठले. दुपारी 12 वाजताच्या सुमारास शहरातील इंदिरा गांधी चौकात बुद्ध बांधवांनी सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी बौद्ध बांधवांनी ग्रापं प्रशासनाव विरोधात जोरदार घोषणबाजी करीत न्यायाची मागणी लावून धरली. यावेळी घटनास्थळी विविध राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटनेच्या पदाधिका-यांनी उपस्थिती दर्शवित सदर घटनेचा निषेध केला. तसेच प्रशासनाने बौद्ध बांधवांना योग्य न्याय देण्याची मागणी केली.

तोडगा न निघाल्याने कार्यालयासमोरच ठिय्या नवरगाव येथील बौद्ध बांधवांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली. दरम्यान बौद्ध बांधवांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिका-यांशी चर्चा करीत न्याय देण्यासंदर्भात निवेदन सादर केले. यावेळी जिल्हाधिका-यांशी चर्चेदरम्यान ठोस तोडगा न निघाल्याने ग्रामस्थांनी परत जिल्हा कार्यालयासमोरच ठिय्या दिला. सायंकाळी उशिरापर्यंत बौद्धसमाजबांधव जिल्हा

कचेरीसमोर ठिय्या देऊन होते.इंदिरा गांधी चौकात निषेध सभा घेतल्यानंतर नवरगाव येथील बौद्ध समाजबांधवांनी आपला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळविले. चौकातून बैलबंडी तसेच पायी प्रवास करीत चंद्रपूर मार्गे प्रस्थान केले. दरम्यान कॉम्पलेक्स परिसर येताच चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरच बौद्ध बांधवांनी चक्काजाम आंदोलन पुकारित आक्रोश व्यक्त करीत नवरगाव ग्रापं प्रशासनावर जातीय तेढ निर्माण केल्याचा आरोप केला.यामुळे काही काळ गडचिरोली-चंद्रपूर मार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना झटका.. आता नऊ सिलेंडरवर नाही; तर चारच सिलेंडरवर मिळणार अनुदान..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात रविवार ७ जून २०२६ पासून २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार, बऱ्याचश्या जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतींनी...

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आधार पडताळणी करणे आवश्यक..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक शेतकरी गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्ती,अवकाळी पाऊस, उत्पादन खर्चातील वाढ आणि शेतमालाला न मिळणारा योग्य भाव,यामुळे आर्थिक संकटाचा सामना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!