Sunday, April 19, 2026
Homeदेसाईगंजशहरातील विविध समस्या घेऊन देसाईगंजकर धडकले नगर परिषदेवर...

शहरातील विविध समस्या घेऊन देसाईगंजकर धडकले नगर परिषदेवर…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहर विविध समस्यांनी ग्रासले आहे.शहरातील नागरिकांनी समस्या दाखविण्यापेक्षा नगर परिषदेने सर्वप्रथम समस्या मार्गी लावणे आवश्यक आहे.मात्र,या ठिकाणी वेगळीच परिस्थिती दिसून येत असल्याने शहरातील विविध समस्या घेऊन देसाईगंजकरांनी नगर परिषदेवर धडक देत नगरपरिषद प्रशासनास धारेवर धरीत समस्यांचा पाढा वाचला व तात्काळ समस्या मार्गी लावण्याची मागणी केली आहे.
देसाईगंज नगर परिषदे अंतर्गत येणाऱ्या भगतसिंग वार्ड व इतरही वार्डात मोठ्या प्रमाणावर नागरिक तसेच सार्वजनिक हितावह समस्या आहेत.भगतसिंग वार्डात बऱ्याच महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असते.बौद्ध विहार तसेच नैनपूर मार्गे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील दिलीप माडावार यांच्या घरासमोर तसेच हनुमान मंदिर, देशमुख टोली या ठिकाणी बोरवेल आहेत.मात्र, बोअरवेल हे केवळ नावापुरतेच आहेत की काय? असा सवाल उपस्थित केला जातो आहे.दिलीप माडावर यांच्या घरासमोरील बोरवेलची अवस्था खूप वाईट आहे.काही ठिकाणी चक्क झुडपांनी वेढा घातला आहे.नाल्यांच्या सफाईचा प्रश्न ऐरणीवर टांगला जातो आहे.त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.काही ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे.बोअरवेल नामधारी असल्याने
 परिसरातील नागरिकांनी बोरवेलचे पाणी भरायचे कसे?शासन स्तरावरून स्वच्छते बाबत कोट्यवधी रुपये दिले जातात.मात्र,त्याचा योग्य वापर होतांना दिसून येत नसल्याची खंत देसाईगंजकरांनी व्यक्त केली आहे.नागरिकांच्या मूलभूत बाबींकडे देसाईगंज नगरपरिषद प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने देसाईगंज वासियांनी नगरपरिषद प्रशासनाप्रती रोष प्रगट केला आहे.
शहरातील समस्या तात्काळ मार्गी लावण्याबाबत देसाईगंज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कुलभूषण रामटेके यांना निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी खेमराज नेवारे सह रवी लांजेवार,जमीर शेख, नरेश वासनिक,मोहनदास पराते,गणेश तलमले,सचिन देशमुख,कैलास पाटील,दिलीप माडावर,अश्विनी लांजेवार,दुर्गा पराते,शोभा वरखडे,कांता तलमले, छगन कुथे,आकाश देशमुख,किशोर खोब्रागडे,प्रकाश रहाटे,सोनू शेंडे,विशाल दुनेदार,संतोष देशमुख,गोविंदा अवसरे,राजु पराते,रवी उईके,राहुल देशमुख,तुषार रहाटे,वैभव परशुरामकर व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!