Friday, October 16, 2026
Homeभंडारारस्ता भटकल्या अन् गावात पोहचल्या; मुले पळविणाऱ्या समजून शेकडो लोकं झाले गोळा

रस्ता भटकल्या अन् गावात पोहचल्या; मुले पळविणाऱ्या समजून शेकडो लोकं झाले गोळा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-मुले चोरणाऱ्या टोळीमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.नुकतेच १ मार्च २०२६ रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारपूर येथील रेल्वे स्टेशन परिसरातून साडेतीन वर्षाच्या बालकाची चोरी करून त्याची साडेतीन लाखात विक्री करण्याचा प्रकार उघडकीस आला होता.प्रकरणी पाच आरोपी महिलांना तेलंगणा राज्यातून अटक करण्यात आली होती.यामुळे परिसरात एखादा अनोळखी इसम वा महिला भटकंती करतांना दिसून येताच नागरिकांचा पारा चढू लागला आहे.अश्याच प्रकारे भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील एकोडी गाव परिसरात दोन दिवसांपूर्वी दोन महिलांना संशयास्पद स्थितीत फिरतांना पाहून नागरिकांचा पारा चढला आणि मुले पळविणाऱ्या म्हणून परिसरात अफवा पसरली.बघता-बघता शेकडो लोकांची गर्दी झाली.विशेष म्हणजे,दोन्ही महिलांची भाषा स्थानिक नागरिकांना समजत नसल्याने संशय आणखीनच बळावला व महिलांना बदडणार,तितक्यातच जिल्हा परिषद सदस्या माहेश्वरी नेवारे यांनी तातडीने एकोडी पोलिस चौकीचे पोलीस कर्मचारी वैरागडे आणि साकोली पोलीस ठाण्याचे स्वप्निल गोस्वामी यांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन्ही महिलांना आपल्या संरक्षणात साकोली पोलीस ठाण्यात नेले.तिथे केलेल्या सखोल चौकशीतअनिता चंदुलाल मोहारे व लक्ष्मी मोहारे रा.किंडगीपार-डोंगरगाव,जि.गोंदिया अशी महिलांची नावे असून त्या मानसिकदृष्ट्या काहीशा अस्वस्थ असल्याने रस्ता भरकटून परिसरात आल्या होत्या.त्या कोणत्याही गुन्हेगारी टोळीतील नसल्याचे निष्पन्न झाल्याने साकोली पोलिसांनी तात्काळ त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून पोलिस वाहनाने त्यांना सुरक्षितरित्या त्यांच्या घरी पोहोचविल्याने मोठा अनर्थ टळला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!