Friday, October 16, 2026
Homeनागपूरनकली नोटा प्रकरणी दोघांना तुरुंगवास..

नकली नोटा प्रकरणी दोघांना तुरुंगवास..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-आठ महिन्यांपूर्वी दोन तरुणांकडे पाचशे रुपयांच्या तब्बल २४३ नकली नोटा मिळून आल्याने नागपूर शहरात एकच खळबळ उडाली होती.प्रकरणी नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश नितीन जाधव यांनी काल शुक्रवारी नकली नोटा व्यवहारात आणणाऱ्या दोन आरोपींना ७ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली असून एकाला ५० हजार व दुसऱ्याला ५० हजाराचा दंड ठोठावला आहे.त्याचबरोबर,दंड न भरल्यास आरोपींना सहा महिन्यांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल,असेदेखील स्पष्ट केले आहे.
अजिम तनू शेख वय २९ वर्षे व जमिरुल ऊर्फ मनीरुल लोकमान शेख हुसैन वय २७ वर्षे,दोघेही रा.कबरेज टोला,जि.मालदा,पश्चिम बंगाल अशी आरोपींची नावे आहेत.मागील वर्षाच्या ६ ऑगस्ट २०२५ रोजी विशेष पोलिस पथक गस्तीवर असतांना त्यांना नागपूरच्या मेयो हॉस्पिटलजवळच्या गार्ड लाइन परिसरामध्ये दोन युवकांकडे नकली नोटा असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ गार्ड लाइन परिसरात सापळा रचला.दोन्ही आरोपींना अडवून त्यांच्याकडील बॅग तपासली असता त्यात पाचशे रुपयांच्या २४३ नकली नोटा आढळून आल्या.पंचांसमक्ष जप्ती पंचनामा तयार करून आरोपींविरुद्ध तहसील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.त्यानंतर,तज्ज्ञांच्या तपासणीत संबंधित सर्व नोटा नकली असल्याचे आढळले. पोलिस निरीक्षक रसूल शेख यांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास केला व जिल्हा सत्र न्यायालयात आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले.न्यायालयात तब्बल ९ साक्षीदार तपासण्यात आले व विविध ठोस पुराव्यांच्या आधारे आरोपींवरील गुन्हा सिद्ध होताच न्यायालयाने दोन्ही आरोपींना तुरुंगवासाची वारी दाखवली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

गडचिरोली जिल्ह्यातील ९६ रेतीघाटांचे होणार लिलाव; सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील वाळू व रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन २०२६-२७ चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!